छान छान गोष्टी भाग 270
![]() |
वाचा रे वाचा! |
लोभी कुत्रा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागलेली होती. तेव्हा त्याला रस्त्याने चालताना एक पोळी सापडते. त्याला एकटयालाच ती पोळी खायची होती त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवून आपल्या तोंडात पोळी धरून तो धावू लागला. धावता धावता तो एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी होते.
कुत्र्याने पाण्यात बघितले तर त्याला पाण्यात आणखी एक कुत्रा दिसला व त्याच्याही तोंडात पोळी होती. त्याला असे वाटले की, पाण्यातील त्या कुत्र्याच्या तोंडातील पोळी आपण हिसकावून घ्यावी. यामुळे तो तोंड उघडून पाण्यातील त्या कुत्र्यावर भुंकू लागला. भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील पोळी पाण्यात पडली व त्याला उपाशी रहावे लागले.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon