छान छान गोष्टी भाग 269
![]() |
वाचा रे वाचा! |
हव्यास
एका गावात एक श्रीमंत माणूस राहात होता. सगळ्यांशी तो कंजुषीनेच वागायचा. एक दिवस त्याच्या घराला आग लागली. आग लागलेली कळताच त्याने सारे मौल्यवान सामान बाहेर काढले आणि शांतपणे तो आग पहात राहिला. लोकही तिथे जमले. लोक म्हणाले, शेटजी तुमचे अजून काही आत राहिले का पहा. नाहीतर यापेक्षा मौल्यवान वस्तू वाड्यात राहिल्या असायच्या. नाही होय करता करता तो आतमध्ये गेला. पाहतो तो काय त्याची बायको त्याच्या दोन मुलांना घेऊन मदतीची याचना करत एका कोपऱ्यात उभी होती. अचानक तिला एका खिडकीचा आसरा मिळाला आणि ती त्या मुलांना घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी झाली. नंतर शेटजीही आला. पण बाहेर आलेली बायको आणि मुले त्याला सोडून निघून गेली. त्याने खूप विनवण्या केल्या. पण बायको आणि मुले म्हणाली, तुम्हाला ज्या मौल्यवान वस्तू हव्या होत्या त्या मिळाल्या. त्यामुळे तुम्ही त्या
जपून ठेवा आणि इथून पुढचे आयुष्य जगा.
तात्पर्य हव्यासापोटी प्रेम, आपुलकी गमावतो.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon