सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 245 दि.21/05/2022

        छान छान गोष्टी भाग 245

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.21/05/2022

गर्विष्ठ गुलाब

 एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,"मला पण पाणी मिळेल का?" दयाळू कॅक्टस लगेच "हो" म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्याला तोंड दिले. 

तात्पर्य: कोणत्याही व्यक्तीविषयी त्याच्या दिसण्यावरून मत बनवू नका.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट 

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »