सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 241 दि.17/05/2022

        छान छान गोष्टी भाग 241

वाचा रे वाचा!






       मंगळवार दि.17/05/2022

देवाची मदत

 समुद्र किनारी एक गाव होते, त्या गावात एक श्यामलाल नावाची व्यक्ती राहत असे, दररोज पूजा पाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रत वैकल्य करणे, या सर्व गोष्टी श्यामलाल करत असे. त्याची देवावर नितांत श्रध्दा आणि विश्वास होता. तो एक दिवस सुध्दा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे. दररोज नित्यनेमाने देवाला पूजत असे.

एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती. आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू केले होते, लोक स्वतःला वाचविण्यासाठी धडपड करत सैरावैरा मदतीसाठी धावत होते.

पाण्याचा स्थर वाढल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यु टीम आली आणि लोकांना वाचवू लागली, बरेच लोक रेस्क्यु टीम च्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते. रेस्क्यु टीम श्यामलाल जवळ सुध्दा गेली पण श्यामलाल म्हणाला,

“मला तुमची काही गरज नाही मला तर माझा देव वाचवणार”

आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यु टीम पुढे निघून गेली. पाण्याचा स्थर वाढतच होता. आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्या मुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला, तेव्हा ही त्याच्या जवळ एक नाव आली ज्यामध्ये काही लोक जात होते त्यांनी श्यामलाल ला म्हंटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया तेव्हा श्यामलाल पुन्हा म्हणाला की,

“मला नावेची गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार आहे”

आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले. पाण्याचा स्थर वाढतच होता, आता पाणी श्यामलाल च्या वरच्या मजल्यावर सुध्दा पोहचले होते, हे पाहून श्यामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो, तेव्हा त्या भागात लोकांना वाचविण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीम श्यामलाल ला म्हणते की हेलिकॉप्टर मध्ये येऊन जा तुझा जीव वाचून जाईल. पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून श्यामलाल त्यांना म्हणतो

“मला तुमची गरज नाही मला तर देव येणार वाचवायला”

हे शब्द ऐकून हेलिकॉप्टर सुध्दा तेथून निघून जाते. सगळ्यांच्या मदतीला श्यामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्थर एवढा वाढतो की श्यामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो. मरण पावल्या नंतर श्यामलाल देवाजवळ पोहचतो. आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, किती पूजा अर्चना केली, व्रत वैकल्य केले. पण तू मला वाचवायला आला नाही. मला मरायला तेथे सोडलं. पण तू काही वाचवायला आला नाही.

तेव्हा देव त्याला म्हणतो तुला काय वाटते तुझ्या जवळ जहाज हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते. मी तर तुला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पण तूच माझी मदत ओळखु शकला नाही,आणि तिथेच मरण पावला. माझ्यावर या प्रमाणे विश्वास करणे योग्य नाही आहे, माझ्यावर विश्वास करण्या अगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखता यायला हवी होती. कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात.

तर मित्रहो, या गोष्टीवरून आपल्याला एक शिकवण मिळते की देव सुध्दा त्यांचीच मदत करतो जे स्वतःचही मदत करतात, म्हणजे आपल्यामध्येच देव आहे फक्त आपण ओळखायला हवे, तर संकटकाळात न घाबरता त्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार रहा देव सुध्दा आपल्या सोबत असेल.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट 

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »