छान छान गोष्टी भाग 211
![]() |
वाचा रे वाचा! |
चतुर कोकरू
एका कुरणात मेंढ्यांचा कळप चरत होता. कळपाची राखण करण्यासाठी काही कुत्रे होते. चरता चरता एक कोकरु कळपाच्या मागे राहिले. कळप पुढे निघून गेला.तिथे एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता .एक कोकरू कळपाच्या मागे राहिल्याचे त्याने पहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला.कोकरु धावू लागले. आपण आता लांडग्याच्या तावडीतून सुटत नाही .हे त्याच्या लक्षात आले होते .मग ते धावण्याचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले ,"लांडगे दादा ,आनंदाने हसत हसत मरावे असे मला वाटते म्हणून तुम्ही थोडावेळबासरी वाजवा .म्हणजे मला खूप खूप आनंद होईल."
लांडग्याने कोकराचे ते म्हणणे मान्य केले .त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली . बासरीचा आवाज कळपातील कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. आलेले कुत्रे पाहताच लांडगा बासरी फेकून देऊन पळून गेला .अशा प्रकारे चतुर कोकरुने मोठ्या चतुराईने आपले प्राण वाचवले.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : बुली आणि वाघ
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon