छान छान गोष्टी भाग 210
![]() |
वाचा रे वाचा! |
खरी संपत्ती
रामू नावाचा एक शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करत असे . त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत असे. त्याला तीन मुले होती .तीनही मुले खूप आळशी होती .त्यामुळे त्याला सतत चिंता वाटत असे की, आपल्यानंतर या मुलांचे कसे होणार? काही दिवसांनी रामू खूप आजारी पडला. त्याने आपल्या तीनही मुलांना जवळ बोलावले .तो म्हणाला," मी काही ह्या आजारातून बरा होईल असे वाटत नाही. तेव्हा जाता जाता एक गुपित सांगतो .आपल्या शेतात खूप धन ठेवलेले आहे." असे सांगितल्यानंतर काही वेळातच त्याचा जीव गेला.
कष्ट न करता धन मिळणार याचा मुलांना खूप आनंद झाला .हे धन शेतात नक्की कोणत्या ठिकाणी ठेवले आहे याची त्यांना माहिती नव्हती . त्यामुळे त्यांनी सर्व शेती खणून काढली . त्यांना कोठेही धन मिळाले नाही. शेवटी त्यांनी आयत्या धनाची आशा सोडून दिली आणि इतके खणले आहेच तर त्यात धान्य पेरून देऊ. असा विचार केला आणि त्यांनी धान्य पेरले .
भरपूर केलेल्या कष्टामुळे त्यावर्षी पीकही भरपूर मिळाले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना वडिलांच्या सांगण्याचा अर्थ समजला की शेतात खूप कष्ट केल्यावरच आपणास धन मिळेल. अशा तऱ्हेने त्यांना कष्टाचे महत्त्व समजले.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : बुली आणि वाघ
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon