छान छान गोष्टी भाग 88
![]() |
वाचा रे वाचा! |
छत्रपती शिवाजी महाराज आणि वृद्ध म्हातारी
छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले होते. मात्र, अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हते. दोन दिवसानंतर शिवाजी महाराज परत फिरले. शिवाजी महाराज परतत असताना, त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले. जंगलातून मार्ग काढताना एका वृद्ध महिलेच्या झोपडीपाशी येऊन थांबले. दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती. न राहून महाराजांनी त्या वृद्ध महिलेला भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. वृद्ध महिलेकडे अन्नधान्याची वानवा होती. तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना मऊसर भात वाढला.
शिवाजी महाराजांना भूक एवढी असह्य झाली होती की, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवायला सुरुवात केली. भात एवढा गरम होता की, महाराजांच्या बोटांना चटका बसला. महाराजांनी हाताला फुंकर मारत चटका शांत करण्याचा प्रयत्न केला. जवळ बसलेली वृद्ध महिला शिवाजी महाराजांचे वर्तन पाहत होती. तिला राहावले नाही आणि ती म्हणाली की, बालका, तुझा चेहरा शिवाजीसारखा आहे. तुझी बुद्धीही शिवाजीसारखी असल्याचे दिसतेय. तुझे वर्तनही शिवाजीसारखे मुर्खपणाचे आहे. वृद्ध महिलेचे हे बोल ऐकून शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटले. आजीबाई, शिवाजी अत्यंत बुद्धीमान आहे, असे मानणाऱ्या अनेक विद्वानांना, बुद्धीवंतांना मी ओळखतो. मग, शिवाजीचे वर्तन मुर्खपणाचे आहे, असे आपल्याला का वाटते?, असा प्रश्न शिवाजी महाराजांनी तिला विचारला.
वृद्ध महिला उत्तरली की, तुम्हाला जेवण वाढले तेव्हा पानात असलेली आणि गार झालेली कंदमुळे खायची सोडून तुम्ही थेट गरम भात जेवायला घेतला. गरम भातामुळे बोटांना चांगलाच चटका बसला. हे वर्तन मुर्खपणाचे नाही तर काय, शिवाजीदेखील असाच मुर्खपणा करत आहे. दूर अंतरावर असलेले छोटे-छोटे किल्ले काबीज करायचे सोडून, सरळ मोठ्या किल्ल्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी लढाई करतोय. पराभव, निराशा पदरी पडणारच.
वृद्ध महिलेच्या या वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाटकन उघडले, डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मोठा विजय मिळवण्याआधी छोट्या-छोट्या चढाया यशस्वी करायला हव्यात. छोट्या किल्ल्यांवर विजय मिळवून हळूहळू विस्तार करत मोठे किल्ले काबीज करायला हवेत, अशी मोठी शिकवण शिवाजी महाराजांना मिळाली. याच शिकवणीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शेकडो किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली सुमारे 300 पेक्षा जास्त किल्ले होते, असे सांगितले जाते.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : तलावातील तारे Frog's Starry Wish
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon