![]() |
वाचा रे वाचा! |
पाणी गढूळ करणारा कोळी
एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.
त्यांपैकी एक म्हणाला,'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?'तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'
तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
मुलांनो,आज तुम्हांला छान गोष्ट पाठवली आहे ती ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. गोष्टीच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर लिहून या ग्रुपमध्ये पाठवा. तसेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना भावंडांना व मित्र-मैत्रिणींना देखील गोष्ट ऐकवा...
खालील गोष्टीच्या Video वर क्लिक करा व गोष्ट ऐका.
🔹️ आजच्या गोष्टीचे नाव : फुलांच्या गोष्टी
ConversionConversion EmoticonEmoticon