यानंतर मी काव्यांकुर समूह प्रशासक श्री दिलीप जाने सर यांना विनंती करते की,त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे🙏
प्रास्ताविक
आम्ही तंत्रस्नेही शिक्षक मंच व काव्यांकुर या राज्यस्तरीय समूहामार्फत विविध उपक्रम नेहमी राबवण्यात येतात. कोरोना काळात नवोदित शिक्षक कवी, कवयित्रींसाठी असाच एक काव्यलेखन उपक्रम राबवण्यात आला. अनेक लिहीते हात या उपक्रमात सक्रिय झाले. त्यातून 'दिवाळी पहाट' हा ई विशेषांक साकार झाला. आज त्या विशेषांकांचे प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने होतांना अत्यानंद होत आहे. आम्हांला नेहमी मदतीस तप्तर असणारे मा. प्रकाशजी च-हाटे साहेब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग हे आजच्या या छोटेखानी समारंभाचे अध्यक्ष म्हणून लाभले असले तरी आजचा हा कार्यक्रम म्हणजे दुग्धशर्करा योग आहे कारण साहित्य क्षेत्रातील दिग्गज सुप्रसिद्ध बालसाहित्यिक मा. एकनाथजी आव्हाड व संगीत, नाट्य, गायन क्षेत्रातील दिग्गज गीतकार, संगीतकार व लघू चित्रपट निर्माते मा. प्रा. उत्पलजी चौधरी आज आपणांस प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे यश आपल्या सर्वांमुळेच शक्य आहे.
दिलीप जाने
चाळीसगाव ( जळगाव )
जिल्हा समन्वयक श्री.संदीप सोनार सर यांना मी नम्र विनंती करते की आपण या कार्यक्रमाचे मा. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा परिचय करून द्यावा.🙏
अध्यक्ष सन्मा.प्रकाश च-हाटे साहेब
प्रमुख अतिथी सन्मा.एकनाथ आव्हाड सर व सन्मा.उत्पल चौधरी सर यांचा अल्प परिचय 👉 CLICK HERE
मी मान्यवरांना विनंती करते,की त्यांनी 'दिवाळी पहाट' या ई- काव्यसंग्रहाचे प्रकाशन करावे🙏🙏
(Pdf download करावे व Flipbook link copy करावी)
सन्मानपत्रे
प्रमाणपत्रे तयार झाल्यावर खालील link वर Upload करण्यात येणार आहेत.
मनोगत
• 'दिवाळी पहाट काव्यसंग्रह' यासाठी लिहिते होणारे सर्व कविवर्य शिक्षक आहेत. याचे विशेष कौतुक ! सर्वांच्या कविता वेगवेगळ्या विषयांवर असून वेगवेगळ्या शैलीत आहेत. वृषाली खाड्ये मॅडम यांनी 'दिवाळी पहाट' या कवितासंग्रहाच्या माध्यमातून या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, याबद्दल आपले खूप खूप आभार आणि या काव्यसंग्रहास मन: पूर्वक शुभेच्छा!
सौ. वर्षा प्रमोद चोपदार.
भैरव विद्यालय, घाटकोपर
8452920080
• आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.च-हाटे साहेब,प्रमुख अतिथी श्री.आव्हाड साहेब,प्रकशिका सौ.वृषाली खाड्ये व सर्व कवी वृंद, मी उत्पल चौधरी आपणास नमस्कार करतो.
मी या कार्यक्रमाचा एक प्रमुख अतिथी आहे हे मी माझे भाग्य समजतो.
आपण सर्व कवी वृंदाने या विशेषांकात खूप छान कवितांचे सादरीकरण केलेले आहे. कवितेच्या माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहचलेला आहात. जनसमुदायाच्या मनाचे व भावनांचे प्रकटीकरण आपल्या या कवितांच्या माध्यमातून केलेले आहे.त्याच प्रमाणे सभोवतालच्या परिस्थितीचे ही उत्तम चित्रण त्यातून झालेले आहे.
असेच छान छान आणि समाजोपयोगी उपक्रम आपल्याकडून होवोत ही शुभेच्छा.
मला जी संधी उपलब्ध झाली त्या बद्दल प्रकाशक व आपल्या सर्वांचे आभार....
आपलाच...
उत्पल चौधरी.फैजपूर.
• सर्वांचे मनापासून अभिनंदन.
आणि पुढील अशाच सुंदर कार्यक्रमासाठी
खूप खूप शुभेच्छाही !
एकनाथ आव्हाड
• काव्यांकूर (महाराष्ट्र राज्य) समूहाने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे मी प्रथम स्वागत करतो. नवोदित शिक्षक कवी- कवयित्रींनी आपल्या भावना 'दिवाळी पहाट' मध्ये उतरवल्या आहेत.भावना काव्यात गुंफणे म्हणजे कवी/कवयित्रींची खरी कसोटी! आणि सर्वजण या कसोटीत उत्तीर्ण झाले आहेत.
काव्य लिहीताना प्रत्येक गोष्ट अनुभवावी लागतेच असे नाही.अनुभवातून सहजता व सुलभता येऊ शकते. जे न देखे रवी,ते देखे कवी! या उक्तीनुसार अनुभव नसतानाही काव्याची रचना होऊ शकते. यासाठी प्रयत्न,कष्ट लागणारच! सर्वांनी लिहिते व्हावे व लिहीते रहाण्यासाठी हा उपक्रम चालू केला. प्रत्येकजण मुलतःच कवी नसेलही, म्हणून काव्य लिहीण्याचा प्रयत्न करू नये का! प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 25 निकषातील 22 वा निकष विद्यार्थ्यांना याच उद्देशाने दिलेला आहे. काव्य कसे लिहावे, याचे मार्गदर्शन शिक्षकांनी केल्यावर चार ओळी लिहीता आल्या तरी बाजी मारली असे म्हणता येईल. लिहीते व्हावे हा हेतू असल्याने हा उपक्रम सुरू केला. हळूहळू सातत्याने लिहीते राहिले तर कदाचित उद्याचा विकसित कवी जन्मालाही येईल!
"दिवाळी पहाट" च्या निमित्ताने अनेकांनी लिहीण्याचा
चांगला प्रयत्न केला आहे.
पुढील प्रकाशमय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!🌹
प्रकाश पुना च-हाटे
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी
बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग
यानंतर मी जिल्हा समन्वयक सुनिता अनभुले मॅडम यांना विनंती करते की,त्यांनी आभार प्रदर्शन करावे.🙏
🌹आभारप्रदर्शन🌹
वसंतात येतो फुलांना बहार
तेव्हा फांद्याच होताच त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
कार्यक्रम झालाय बहारदार
वातावरण झाले मजेदार
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमास आलीय बहार.
तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
या सुंदरशा काव्यपंक्तीने मी सौ. सुनिता पांडुरंग अनभुले,मुंबई (प्रशासिका)
आपणां सर्वांचे शब्दसुमनाने आभार मानते🌹
आपल्या उपस्थितीचे मूल्य आम्ही जाणतो मनापासून...... म्हणूनच आम्ही आपलं आभार मानतो हृदयापासून ...
काव्यांकुर समूह (महाराष्ट्र राज्य) अक्षरक्रांती प्रकाशन
'दिवाळी पहाट ई-काव्यसंग्रह' प्रकाशन सोहळा, प्रायोजक सकाळ माध्यम. अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत दिवाळी पहाट ई - काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
उपरोक्त ऑनलाईन कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून प्रोत्साहन देण्यासाठी आलात. त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सन्मानीय श्री.प्रकाश च-हाटे साहेब यांचे मनापासून आभार!🙏🏻🌹
प्रमुख अतिथी सन्मा.सुप्रसिद्ध बालसाहित्यिक कवी श्री. एकनाथ आव्हाड सर, तसेच प्रमुख अतिथी गीतकार व संगीतकार सन्माननीय प्रा. उत्पल चौधरी सर यांचेही मनापासून आभार!🌹🙏
आजचा नेत्रदीपक प्रकाशन सोहळा यशस्वी होण्यासाठी अनेक हातांचे सहकार्य लाभले. उत्तम जबाबदारी सांभाळलेले श्री.मिलिंद पगारे (नाशिक),सुरज कुदळे,(नाशिक), संदीप सोनार (जळगाव),सुनील द्रविड (कोल्हापूर),दिलीप जाने (जळगाव), अंजली ठाकुर (यवतमाळ), साईली राणे(मुंबई), सुनिता अनभुले (मुंबई),वर्षा चोपदार (मुंबई),राहुल मुंडे (ठाणे),गजानन पुंडे (बुलढाणा) संपादक मंडळातील या सर्वांचे विशेष असे शतशः आभार!🙏🌹
सगळ्यात महत्वाचे 'दिवाळी पहाट' ई काव्यसंग्रहात सहभागी कवी, कवयित्री त्यांचेही मनःपूर्वक आभार मानते.🌹
सदर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व बंधूभगिनींचे मी आभार मानते.🌹
आपल्या बहारदार वक्तृत्वाने आजच्या कार्यक्रमाची रंगत ज्यांनी वाढवली अशा या सुंदरशा सोहळ्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती साईली राणे मॅडम यांचेही धन्यवाद🌹
आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच समुहाचे शैक्षणिक उपक्रम,स्पर्धा, तंत्रज्ञान कार्यशाळा शिस्तबद्ध व नियोजनानुसार उत्तम प्रकारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात, तसेच 'दिवाळी पहाट' काव्यसंग्रहासाठी अतोनात मेहनत घेऊन आजच्या कार्यक्रमात आपणां सर्वांना एका माळेत गुंफणा-या प्रमुख व मुख्य प्रशासिका,संपादिका,प्रकाशक वृषाली खाड्ये मॅडम (मुंबई) यांचे संपादक मंडळातर्फे शतशः आभार!🌹🙏
ऋणी आहोत आम्ही आपले,देतो शब्दसुमनांचा उपहार,
अनमोल वेळ दिलात आम्हांसाठी, आज मानतो आपले आभार🌹
या सोहळ्यात सहभागी सर्व मान्यवरांचे सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद!🙏🌹
अजाणतेपणी नकळतपणे जर कुणाचे आभार मानण्याचे राहून गेले असेल तर पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते.
धन्यवाद पुनःश्च!🙏
मनोगत कवी/कवयित्रींचे!
•'दिवाळी पहाट काव्यसंग्रह' वृषाली खाड्ये मॅडम यांनी 'दिवाळी पहाट' या कवितासंग्रहाच्या माध्यमातून मनातील विचार, भावना व्यक्त करण्याची संधी दिली. याबद्दल मी वृषाली मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे खूप- खूप आभार व्यक्त करतोय.
श्री. प्रदीप विष्णू गावडे (सहा. शिक्षक-माध्यमिक)
विक्रोळी, मुंबई
• प्रकाशन सोहळा असे हा भारी ,👌👍
अभिनंदनाचा सारे वर्षाव करी, 🥳👏
मनोगत व्यक्त करण्या जाहले आतुर💃
काव्यप्रकाशन हे वाटे मज🙏
लाभले जसे पंख मयूर🦚
सौ. पुष्पा शशिकांत कानफाडे,मुंबई
• छान सुंदर अप्रतिम आजचा
काव्य प्रकाशन सोहळा..
जमले तंत्रज्ञानी शिक्षक
शब्द मोती झाले आज
कवि कवयत्रींनी
गुंफली मोतीयाची माळ ...📖
असून करोनाचा काळ
शब्द बध्द दिप काव्य..
लावूनी
काव्य ज्योती ज्योत
प्रकाशन झाले आज....📒📖📒
सहभागी शिक्षक
मान्यवर
तंत्रज्ञ प्रकाशक ..
उद्घघाटक
सहाय्यक अन मुद्रक या
सर्वांचे मानूया मनापासून आभार..
मार्गदर्शक वृषालीताईंचे
खास मानूया आभार....
🎉📱📒📖📱🎉
💐🙏🏻
शैलेंद्र जोशी जिल्हा- रत्नागिरी
• आभार कसे मानावे सांगा
निःशब्द मी झाले
व्यासपीठ मिळवून दिले हे
ऋणात सदा राहिले
उल्लास, हर्ष ,मोदची झाला
कसा सांगा वर्णावा ??
प्रणाम अमुचा मान्य वराना
स्विकारची व्हावा 🙏🏼🙏🏼🌹🌹
संप्रवी कशाळीकर, सावंतवाडी
• अप्रतिम असा हा प्रकाशन सोहळा. वृषाली ताई आणि चमुचे स्वागत करणे क्रमप्राप्त यासाठी की, त्यांनी या माध्यमातून माझ्यातल्या बरेच दिवसांपासून दृष्टीआड होत चाललेल्या कवीला पुन्हा समोर आणलंय-प्रेरित केलंय.
पुनःश्च सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
महेश वसंतराव राजूरकर
बडनेरा-अमरावती
• सर्वांचे मनापासून आभार
नवोदितांना आपण व्यासपीठ दिले.अशा सुंदर कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा💐🙏🏻🙏🏻
ज्योत्स्ना आर.पवार.(पिसे) वर्धा
• असा काव्य प्रकाशन सोहळा
पहिला ना कधी आम्ही
दिवाळी पहाट ई काव्यसंग्रह
खरोखर दिवाळी सारखा वाटला
चांगले मान्यवर प्रकाशन
सोहळ्यास आम्हा लाभले
सर्वांचे भाग्य उजळले.
नवकविना आपले विचार
शब्दांत मांडण्याची एक
सुवर्ण संधी मिळाली
आभार तुम्हा सर्व
आयोजकांचे,मान्यवरांचे
असेच चांगले प्रसंग यावे
आपल्या सर्वांच्या दैनंदिनी.
गडहिरे राजू तुळशीराम 🙏🏻
कल्याण पश्चिम जि. ठाणे
• 🙏🙏🌹सर्व आयोजकांचे मनपासुन आभार
नवोदितांना आपण व्यासपीठ दिले.अशा सुंदर कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा💐🙏🏻🙏🏻
सौ.छाया राडे,वर्धा
• आगळावेगळा ,जगावेगळा
असा हा काव्यप्रकाशन सोहळा
सारे कविवर्य झाले गोळा
साहित्यिकांचा भरला मेळा
मान्यवरांच्या आगमनाने
मने भारली आनंदाने
नवकवींची शब्द सुमने
नानाविध अप्रतिम कवने
छान ,साजिरी ,गोजिरी वाणी
गुणीजनांची अमृतवाणी
संध्यासमयी अशी पर्वणी
आम्ही आपले आहोत ऋणी!!!
सौ. लीना विशाल कांबळे
सहा. शिक्षिका - गुंदवली एम पी एस.अंधेरी पूर्व,मुंबई
2 comments
Click here for commentsसदर प्रकाशन सोहळा अतिशय उत्कृष्ट,उच्च दर्जाच्या नियोजनात पार पाडण्यात आला.असं क्षणभरही वाटलं नाही की,आपण काही शे किलोमीटर अंतरावर आहोत,आणि हेच या प्रकाशन सोहळ्याचे शंभर नंबरी यश आहे.असा शानदार सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजक टिमचे मनापासून धन्यवाद...आणि पुढील कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा...������
Replyछान
ReplyConversionConversion EmoticonEmoticon