एक भारत श्रेष्ठ भारत
भाषा,वेश जरी भिन्न
ठेवु एकतेचे भान रे!
विविधतेतुनी एकात्मतेची
दिली जगाला शिकवण रे !
सदैव स्मरु इतिहासाला
तिरंगा आमुचा प्राण रे!
दिले बलिदान देशासाठी
थोर क्रांतीविरांची खाण रे !
जगताला वाटो हेवा
तुच आमुची शान रे !
उंच नभी ठेवू तुला
हीच आमुची आण रे !
रविभास्कर नभी जोवर
गावू तुझे गान रे !
देवू सलामी निर्भीडतेने
तूच आमुचा अभिमान रे !
यशस्वी टिळा मस्तकावरती
स्वातंत्र्यदिनाचा जयघोष रे !
एक भारत श्रेष्ठ भारत
सर्व जगात आहे महान !
सौ. मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी.ए .सोढा सार्वजनिक हायस्कूल
व कनिष्ठ महाविद्यालय , नवापूर जिल्हा नंदुरबार
मो.नं.९६६५१८९९७७
मेल patilmeghaa@gmail.com
ConversionConversion EmoticonEmoticon