सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

ग्रेट भेट : मिलिंद काशिनाथ पगारे

                   🌳   पर्यावरणप्रेमी 🌴

                   मिलिंद काशिनाथ पगारे

MKPagare Eco पर्यावरणप्रेमी 👈 येथे click करा.

प्लास्टिक प्रदूषण हटवा! जीवन वाचवा!!

संपर्क : ९९६७०१२८८४, ७०१६२०४२७४, mkpagare@gmail.com

युट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UCkNUQv-WJVDcDrQyP4FRj1g

फेसबुक

https://www.facebook.com/milind.pagare.752

• व्यवसाय :  पूर्णवेळ प्लास्टिक प्रबोधन

१९७६ पासून देश विदेशात नोकरी करत असतांना अनेक निर्व्यसनी सहकारी कर्करोगाने गेलेले बघितले.

तंबाखू, बीडी, सिगरेट याशिवाय दूसरे कारण नक्कीच असणार असा विचार करून शोध घेतला असता प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हे गंभीर व्याधी होण्यामागे महत्वाचे कारण असल्याचे समजले.

संबंधित माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी भारतभर भ्रमण चालू आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथे शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालये तसेच सार्वजनिक सभातून कार्यक्रम केले.

एक तासाच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा उगम, वापर, कचरा, पर्यावरण आणि आरोग्यावर दुष्परिणाम, बचावाचे सोपे उपाय, कचरा व्यवस्थापनातील कायदेशीर तरतूदी तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधी यावर चित्रफीतीद्वारा माहिती दिली जाते.

ठळक आठवणी 

२ डिसेंबर २०१६ ते १४ फेब्रुवारी २०१७ या ७५ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात, ५५ शहरात, ४३६० किमी प्रवास करून १०१ प्रबोधन कार्यक्रम सादर केले.

शरद  व्याख्यान माला कारंजा लाड जि. वाशीम

संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती

शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर

सोलापूर महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका आणि अन्य  संस्था, इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स

चंद्रपुर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

कल्याण आणि नवी मुंबई पालिका शाळांमधून प्रबोधन काम केले.

वनराई (पुणे) संस्थेच्या  प्लास्टिक कचरा मुक्त अभियानात सहभाग.

पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीने प्रबोधन कार्यक्रम

छत्तीसगड पर्यावरण संरक्षण मंडळ यांचे वतीने जनजागृती अभियान

नाशिक येथे पर्यावरणपूरक शवदहनात सक्रीय सहभाग 

पुणे विभागीय आयुक्तांचे वतीने आयोजित जिल्हानिहाय जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन 

बाल विद्यार्थ्यांना प्राथमिक शैक्षणिक साहित्य वाटप 

प्लास्टिक कचरामुक्त ओझरखेड या उपक्रमात प्रबोधन आणि कृती कार्यक्रमात सहभाग. (प्लास्टिक कचरा संकलन करून टाकावू प्लास्टिक बाटल्यात भरून दहा फूट लांबीची भिंत बांधली.)

पुढील कार्यक्रम सुद्धा उपलब्ध आहेत.

पर्यावरणपूरक शवदहन – झाडे जगवा! झाडे वाचवा!! 

शेतातील काटक्या, पालापाचोळा इ. वापरून बनवलेल्या पर्यायी इंधनाचा वापर करून शव दहन 

शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची संधी 

रस्त्यावर मर्गदर्शन  

किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार

नोकरीचा  शेवटचा दिवस  

 वाहतूक विभागासाठी मदत

पोलीस मदत  

शाळेत कृती  कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप

Previous
Next Post »