सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 57

   

ज्ञानकुंभ - 57  
पहिल्या अक्षरावर अनुस्वार असणारा शब्द लिहा.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ शुक्रवार दिनांक 03/04/2026

उपक्रम : पहिल्या अक्षरावर अनुस्वार असणारा शब्द लिहा.

🔺️ प्रश्नसूची

• उदाहरण - जमिनीखाली येणारी भाजी

उत्तर — कंदमूळ

१) ग्रहणाचा एक प्रकार—

२) कचर्‍याची गाडी—

३) शंकराचे एक नाव—

४) देवासमोर अखंड लावायचा दिवा —

५) पूज्य—

६) खूप गार—

७) कैदी—

८) साष्टांग नमस्कार—

९) गंगेचे पाणी

१०) विद्रोह करणारा—

११) एक रोग—

१२) संघाचे हे खूप शिस्तबद्ध असते—

१३) सांज—

१४) गणपतीचा प्रसाद—

१५) रावण—

१६) राजकपूरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी—

१७) रांगोळी—

१८) गाढव—

१९) रावणाची बायको—

२०) गणपतीचे एक नाव—

२१) हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान—

२२) तामिळनाडुतील एक जिल्हा—

२३) एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे

२४) काळोख—

२५) कुळाची यादी—

२६) साठवुन ठेवलेले पैसे—

🔺️ उत्तरसूची 

१) ग्रहणाचा एक प्रकार -- खंडग्रास

२) कचर्‍याची गाडी—घंटागाडी

३) शंकराचे एक नाव --- शंभुनाथ

४) देवासमोर अखंड लावायचा दिवा—नंदादीप

५) पूज्य—वंदनीय

६) खूप गार—थंडगार

७) कैदी— बंदीवान

८) साष्टांग नमस्कार— दंडवत

९) गंगेचे पाणी - गंगाजल

१०) विद्रोह करणारा— बंडखोर

११) एक रोग— पंडुरोग

१२) संघाचे हे खुप शिस्तबद्ध असते— संचलन

१३) सांज—संध्याकाळ

१४) गणपतीचा प्रसाद— पंचखाद्य

१५) रावण—लंकाधीश,लंकापती

१६) राजकपूरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी—मंदाकिनी

१७) रांगोळी— रंगावली

१८) गाढव— लंबकर्ण

१९) रावणाची बायको—मंदोदरी

२०) गणपतीचे एक नाव—लंबोदर

२१) हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान—गंडस्थल

२२) तामिळनाडुतील एक जिल्हा—तंजावर

२३) एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे- गंधवार्ता

२४) काळोख—अंधःकार

२५) कुळाची यादी—वंशावळ

२६) साठवुन ठेवलेले पैसे— गंगाजळी

Newest
Previous
Next Post »