सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 08 February

   

दैनिक परिपाठ

08 फेब्रुवारी  

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार
स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.

🔺️ दिनविशेष 
१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.

२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : सुगावा लागणे - शोध लागणे, तपास लागणे. 

▪️वाक्य : पोलिसांना चोराचा सुगावा लागला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : कानात बुगडी, गावात फुगडी – 
▪️अर्थ  : कमी संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.

🔺️ कोडे 
▪️मी नेहमी तुमच्या पुढे असतो 

तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही 

सांगा पाहू मी कोण? 

▪️उत्तर- भविष्य

🔺️ सामान्यज्ञान 

१) सत्यार्थ प्रकाश रचना कोणी केली ?
उत्तर - स्वामी दयानंद सरस्वती

२) जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर - 8 सप्टेंबर

३) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो? 7 
उत्तर - एप्रिल

४) महाराष्ट्र सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे ?
उत्तर - औरंगाबाद

५) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तर - १ मे १९६०

🔺️ बोधकथा
मनोबल

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. 

एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत ही वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. 

माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

तात्पर्य - निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »