सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 27

  

ज्ञानकुंभ - 27  
वाक्यांमध्ये लपलेले दागिने शोधा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ शुक्रवार दिनांक 20/02/2026

उपक्रम : वाक्यांमध्ये लपलेले दागिने शोधा.

🔺️प्रश्नसूची

खालील वाक्यांमध्ये लपलेले दागिने शोधा.

१) शीला ही फुले कुठून  आणलीस? -

२) ज्येष्ठांना रितसर आमंत्रण द्यावे. - 

३) तो आईची हाक ऐकल्यावर पटकन पळाला. - 

४) लीला टरबूज पाटावर ठेव.- 

५) कपड्याचा गठ्ठा बांधून गाडीत ठेव.- 

६) बटाट्याचा कीस वाळला का? -

७) मे महिन्यात थंडाव्यासाठी खसा ची ताटी लावतात.- 

८) दीडपट मोठे प्रतिबिंब दिसले.- 

९) बेबी ठकीला घेऊन गोल गोल फिरली.- 

१०) जाडे पोहे आणतो आहेस ना?- 

११) त्याने रागाने जोरात चावी व डबा आपटला.- 

१२) तो चोर माडीवर लपला.-  

१३) नभी विहरतो पक्षांचा थवा -

१४) मंदा व वसुधाने चित्र काढून आलेली मरगळ घालवली- 

१५) उपवासासाठी खरवस केळी आहेत.- 

१६) कुख्यात गुंडाला तडीपार केले.- 

१७) पेन्सिलने पाटीवर काढलेले चित्र चिंधीने चटकन पुसले.-

१८) मी जाते त्या वेळी नेमका जुना बाजार बंद असतो.- 

१९) गडाच्या बुरुजावर गाडी जाऊ शकत नाही.-

🔺️उत्तरसूची

खालील वाक्यामध्ये लपलेले दागिने शोधा.

१) शीला ही फुले कुठून  आणलीस? - फुले, ठूशी

२) ज्येष्ठांना रितसर आमंत्रण द्यावे.- सरी, सर

३) तो आईची हाक ऐकल्यावर पटकन पळाला. - हार

४) लीला टरबूज पाटावर ठेव.- पाटली

५) कपड्याचा गठ्ठा बांधून गाडीत ठेव.- बांगड्या

६) बटाट्याचा कीस वाळला का? - वाकी

७) मे महिन्यात थंडाव्यासाठी खसाची ताटी लावतात. - मेखला

८) दीडपट मोठे प्रतिबिंब दिसले.- बिंदी

९) बेबी ठकीला घेऊन गोल गोल फिरली.- फिरकी (बाळी) 

१०) जाडे पोहे आणतो आहेस ना?- तोडे

११) त्याने रागाने जोरात चावी व डबा आपटला.- जोडवी

१२) तो चोर माडीवर लपला.-  तोरडी / तोरड्या

१३) नभी विहरतो पक्षांचा थवा.- नथ

१४) मंदा व वसुधाने चित्र काढून आलेली मरगळ घालवली.- मंगळसूत्र

१५) उपवासासाठी खरवस केळी आहेत.- वाळी

१६) कुख्यात गुंडाला तडीपार केले.- कुडी

१७) पेन्सिलने पाटीवर काढलेले चित्र चिंधीने चटकन पुसले.- चिंचपेटी

१८) मी जाते त्या वेळी नेमका जुना बाजार बंद असतो.- बाजुबंद

१९) गडाच्या बुरुजावर गाडी जाऊ शकत नाही.- बुगडी

Previous
Next Post »