ज्ञानकुंभ - 19
कोडी
🔶️ संकलित
❇️ मंगळवार दिनांक 10/02/2026
उपक्रम : कोडी सोडवूया.
खालील कोड्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा.
१. काळा खडक पिवळं पाणी आत पोहते चंदाराणी.
२. काळी काठी तेल लाटी, वाकते पण मोडत नाही.
३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम.
४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी.
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली.
६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे.
७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा.
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर.
११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी.
१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले.
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं.कात नाही, चुना नाही,तोंड कसं रंगलं!
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा.
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर.
१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान.
१७. हरणं पळतं, दूध गळतं.
१८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई.
१९. काळी गाय,काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय.
२०. वीस लुगडी,आतून उघडी.
२१) तिरपा डोळा कोट काळा,खाण्यावर याचा नेहमी डोळा.
२२) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे,पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे.
२३) जन्मापासून तुम्हांला मिळाले,तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले.
२४) एका बाटलीत दोन रंग, फुटली की सगळेच दंग.
२५) बाळ हातभर, जावळ कोपरभर.
२६) एवढासा गडू ,मोठे मोठे लागती रडू.
२७) लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले!
उत्तरसूची
१. काळा खडक पिवळं पाणी आत पोहते चंदाराणी = काळी कढई,तेल,पुरी
२. काळी काठी तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = केस
३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम = विहीर व विहिरीतील पाणी
४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी = डोळे
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली = नाकातील सर्दी
६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे = जीभ
७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या = चांदण्या
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = कांदा
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = शहाळ
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = कुलूप
११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी = फुंकणी
१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = उंबराचे फूल
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं,कात नाही, चुना नाही,तोंड कसं रंगलं = पोपट
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = वेलदोडे
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे
१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ
१७. हरणं पळतं, दूध गळतं = जाते व त्यातून पडणारे पीठ
१८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई =बासरी
१९. काळी गाय,काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चप्पल
२०. वीस लुगडी,आतून उघडी = मक्याचे कणीस
२१) तिरपा डोळा कोट काळा
खाण्यावर याचा नेहमी डोळा = कावळा
२२) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे,पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. = उल्का
२३) जन्मापासून तुम्हांला मिळाले,तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. = तुमचे नाव
२४) एका बाटलीत दोन रंग,
फुटली की सगळेच दंग. = अंड
२५) बाळ हातभर, जावळ कोपरभर. = मांजर
२६) एवढासा गडू ,मोठे मोठे लागती रडू. = कांदा
२७) लाल रसदार दाणे गर्दीत बसले,सांगा पाहू फळ हे कसले! = डाळिंब

ConversionConversion EmoticonEmoticon