
दैनिक परिपाठ
28 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️ सुविचार
तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका ; कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल.
🔺️ दिनविशेष
२०१० : १९७५ मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
१९७७ : मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६ : चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
१९६१ : ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
१६४६ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : मुग्ध होणे - मोहित होणे.
▪️वाक्य : स्मिताचा नृत्याविष्कार पाहून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : उंटावरचा शहाणा
▪️अर्थ : मूर्ख सल्ला देणारा.
🔺️ कोडे
▪️रामच्या वडिलांना एकूण चार मुले आहेत.
पहिल्या मुलाचे नाव – ABC
दुसऱ्या मुलाचे नाव – DEF
तिसऱ्या मुलाचे नाव – GHI
तर मग चौथ्या मुलाचे नाव काय?
▪️उत्तर – राम
🔺️ सामान्यज्ञान
१) प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ कोण होते?
उत्तर - संत निवृत्तीनाथ
२) देवा तुझा मी सोनार| तुझे नामाचा व्यवहार| हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांनी लिहिलेला आहे?
उत्तर - संत नरहरी सोनार
३) 'अंतरीचे गूज बोलू ऐसे काही वर्ण' ही अभंगाची ओळ कोणत्या संतांनी लिहिलेली आहे?
उत्तर - संत गोरा कुंभार
४) ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे?
उत्तर - संत मुक्ताबाई
५) कोणाच्या विष्ठेद्वारे बीजप्रसार मोठ्या प्रमाणात होतो?
उत्तर - पक्ष्यांच्या
🔺️ बोधकथा
एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण त्याची चारही मुले मात्र अत्यंत आळशी होती. त्यांना कामाचा कंटाळा येत असे आणि दिवसभर ते फक्त गप्पा मारण्यात वेळ घालवत.
शेतकरी आता म्हातारा झाला होता. त्याला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्याने एक युक्ती लढवली. त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलावले आणि सांगितले, "मुलांनो, आता माझा शेवट जवळ आला आहे. आपल्या शेतात मी खूप मोठे धन (खजिना) गाडून ठेवले आहे. माझ्या पश्चात तुम्ही ते खोदून घ्या आणि सुखाने राहा."
काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वडिलांनी सांगितलेल्या सोन्याच्या हव्यासापोटी चारही मुले शेतात गेली. त्यांनी संपूर्ण शेत कोपरा न कोपरा खोदून काढला, पण त्यांना तिथे कोणत्याही प्रकारचे धन सापडले नाही. मुले निराश झाली.
तेवढ्यात तिथून गावातील एक जाणकार माणूस जात होता. त्याने मुलांना पाहिले आणि सल्ला दिला, "आता तुम्ही शेत पूर्ण खोदलंच आहे, तर त्यात बी-बियाणे का पेरून पाहत नाही?"
मुलांनी नाईलाजाने शेतात बी पेरले. त्यावर्षी पाऊस चांगला झाला आणि शेतात सोन्यासारखे पीक डोलू लागले. जेव्हा त्यांनी ते धान्य विकले, तेव्हा त्यांच्या हातात खूप पैसे आले.
त्यांना आता वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. खरे धन हे जमिनीत गाडलेले नव्हते, तर ते कष्टाने पिकवलेल्या धान्यात होते.
तात्पर्य (Moral):
"कष्टाशिवाय फळ मिळत नाही. मेहनत हाच यशाचा आणि सुखाचा खरा मार्ग आहे."
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon