ज्ञानकुंभ - 06
'मे' अक्षरापासून सुरू होणारे शब्द
🔶️ लेखन : तेजश्री कुलकर्णी,मुंबई
❇️ शनिवार दिनांक 24/01/2026
● उपक्रम : 'मे' अक्षरापासून सुरू होणारे शब्द
1: अंधारात प्रकाश देणारी : मेणबत्ती
2: ढगांचा गडगडाट : मेघनाद
3: कुपोषणासाठी प्रसिद्ध : मेळघाट
4: सिंहासनावरील छत्री/ घुमट : मेघडंबरी
5: राजस्थानातील एक प्रांत : मेवाड
6: गुपित/ ग्यानबाची : मेख
7: एक पालेभाजी : मेथी
8: नाकातील घाण : मेकूड
9: टेबल : मेज
10: चरबी : मेद
11: पूजेसाठी भोजनासाठी आमंत्रित केलेले दांपत्य : मेहूण
12: कटीचा अलंकार : मेखला
13: ढग : मेघ
14: मुलीचं नाव : मेघा/मेधा/मेघश्री/मेघना
15: कृष्णाचं एक नाव : मेघमल्हार/ मेघश्याम
16: एक दंतमंजन : मेस्वाक
17: मजुरी / मोल : मेहनताना
18: त्रासणे / जेरीस येणे : मेटाकुटीस येणे
19: खास जेवण : मेजवानी
20: गोड खाऊ/ करवंदे बोरे म्हणजे रान ...: मेवा
21: पालखी : मेणा
22: खास कृपादृष्टी : मेहेरबानी
23: पृथ्वी : मेदिनी
24: श्रम : मेहनत
25: विशेष मर्जी : मेहरनजर

ConversionConversion EmoticonEmoticon