सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Certificates Najarana Kavyasangrah

अक्षरक्रांती प्रकाशित 
'नजराणा' काव्यसंग्रह 








🔺️अक्षरक्रांती प्रकाशन

नोंदणी क्रमांक : 100139642103

🔺️अक्षरक्रांती ISBN 

नोंदणी क्रमांक : 2987 |ISBN| 2021| P

📕 नजराणा काव्यसंग्रह 

🔺️ ISBN NUMBER 

978-81-951768-4-7

🔺️ प्रथम आवृत्ती 19/02/2022

(छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित)

🔻 मुखपृष्ठ  👇


🔻 मलपृष्ठ  👇


🔺️ शुभेच्छा  :  एकनाथ आव्हाड (सुप्रसिद्ध बालसाहित्यकार )

📕 आमचे प्रकाशित ई-काव्यसंग्रह वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

🔻 'कौतुक' फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

🔻प्रमाणपत्रे खालील पद्धतीने Download करा.👇

👉 आपले नाव शोधण्यासाठी Sheet वरखाली व उजवीकडे डावीकडे बोटाने सरकवा.

👉 blue रंगात आपल्या नावासह Certificate लिहीलेल्या शब्दावर क्लिक करा.

👉 Drive मधे Certificate open करा.

👉 वर उजवीकडील तीन टिंबावर क्लिक करा.

👉 send a copy किंवा download करू शकता.

👉 Google chrome किंवा  अन्य browser मधेही open करून download करता येईल.

📢 सहभाग प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे : 

 

❇ पुस्तक परिचय : ना.सा.येवतीकर सर

विद्यार्थ्यांसाठी गीतांचा उत्कृष्ट " नजराणा " काव्यसंग्रह

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित आणि वृषाली सुरेश खाडये यांच्या अथक परिश्रमातून संपादित झालेलं " नजराणा " प्रातिनिधिक काव्यसंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना देखील आनंद देणारा असा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून पुस्तक वाचताना मुलं कसे रममान होतात ? याची प्रचिती प्रत्यक्षात हे पुस्तक वाचतांना मिळेल. एकापेक्षा एक सुंदर व सुरस अश्या कविता आहेत जे वाचताना वाचक नक्कीच दंग होतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, कवी आणि कवयित्री यांनी " शाळा व विद्यार्थी " केंद्रबिंदू मानून कविता लिहिल्या आहेत आणि संपादिका वृषाली सुरेश खाडये यांनी उत्तमरित्या संकलन करून त्यावर संपादन करण्याचे काम केले आहे. पर्यावरण, निसर्ग, शाळा, शिक्षक, तंत्रज्ञान, अभंग या विषयावर बालकवितांचा समावेश केलेला आहे. यातील सर्वच कविता वाचनीय, काही लयबद्ध तर काही बडबड गाण्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकीच काही विशेष म्हणजे दिलीप यशवंत माने आपल्या श्रावण कवितेतून म्हणतात, 

ओथंबून नभ आले

अवनीच्या रे भेटीला

श्रावणात असा सारा

घननिळा बरसला

श्रावण महिन्यात आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि धरतीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात याचेच वर्णन कवी आपल्या या कवितेतून केले आहे. 

अंगाईगीत सहसा आईच्या मुखातून ऐकायला मिळते मात्र प्रा. प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी मुलाला झोपविण्यासाठी वडिलांनी म्हणजे बाबांनी गायलेलं अंगाई गीत लिहिले. ते म्हणतात

बैल झोपले वाड्यात, खोप्यामध्ये चिमणदादा

परसातील बागेमध्ये, झोपला रे गुलाब-चाफा

अंगावर घे पांघरूण, वाट आता नको पाहू

शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे प्रतिभा बोबे यांचे अंक गाणे, प्रभाकर शिंदे यांचे बे एके बे हे पाढ्यावरील गाणे लयबद्ध आहेत. ती कविता वाचतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळणार आहे. संध्याराणी कोल्हे यांच्या पाऊस या कवितेतून कवयित्री म्हणतात की, 

पावसाचे गाणे भिजत भिजत गाऊ

वृक्षासव आपणही आनंदाने न्हाऊ

लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. त्याच बाबीचा संदर्भ लक्षात घेऊन वृक्षाचे महत्व ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 

पाणी हेच आपुले जीवन

काटकसरीने वापरू हे धन

असा छानसा संदेश सौ. रोहिणी राजेंद्र गायकवाड हे पर्यावरण या कवितेतून दिला आहे. 

साने गुरुजी यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेतून गायले जाते. त्याच काव्याचा आधार घेऊन सौ. स्नेहल अमित ओंबळे यांनी खरा तो एकचि धर्म ह्या कवितेतून ते म्हणतात, 

कुणा ना व्यर्थ तोडावे

कुणा ना व्यर्थ मोडावे

समस्ता जीव गणावेख

निसर्गा मित्र मानावे

कोणतेही झाड विनाकारण तोडू नये, मोडू नये, प्रत्येक सजीवात जीव असतो हे जाणून घेऊन संपूर्ण निसर्गाला मित्र मानावे असा सुंदर संदेश आपल्या कवितेतून दिले आहे. तंत्रस्नेही शिक्षक, संगणक आणि देशावर आधारित कवितांचाही यात समावेश केलेला आहे. 

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बडबडगीते खूप आवडतात. सुनीता पांडुरंग अनभुले यांच्या माणसा जग वाचव .... सायली राणे यांची उंदीरमामा, प्रवीणा वाघमारे यांची वृक्षगीत या बालानो या रे या अश्या अनेक सुंदर बडबड गीतांच्या कविता यात आहेत. एकापेक्षा एक असे सुंदर कविता या काव्यसंग्रहात वाचकांना वाचण्यास मिळतात. 

या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. सुरज कुदळे, संदीप सोनार, दिलीप जाने, वर्षा चोपदार आदीनी संपादकीय मंडळात काम करून काव्यसंग्रह उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 65 पृष्ठात साठ कवी-कवयित्रींच्या कविता  आहेत. या काव्यसंग्रहाचे स्वागतमूल्य 150 रु. आहे. प्रत्येक मराठी शाळेत संग्रही असायलाच हवे असे हे काव्यसंग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक शाळा प्रमुखांनी व जाणकार वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे त्यासाठी संपादिका वृषाली सुरेश खाडये यांच्याशी 9967001411 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करून सदरील काव्यसंग्रह पोस्टाने मागविता येईल. येत्या काळात असेच अजून छान छान काव्यसंग्रह वाचण्यास मिळो हीच सदिच्छा .....!

पुस्तक परिचय - 

नासा येवतीकर, कवी तथा विषय शिक्षक

कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड

9423625769

धन्यवाद .......!

 🔺️ संपादक मंडळ 

▶️ वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई)

संपादिका व प्रकाशक 

▶️ सुरज राजेंद्र कुदळे (नाशिक)

मुखपृष्ठ व आतील सजावट 

▶️ संदीप मधुकर सोनार (जळगाव)

संपादन सहाय्य

▶️ दिलीप यशवंत जाने (जळगाव)

अक्षरजुळणी 

▶️ वर्षा प्रमोद चोपदार (रायगड)

अक्षरजुळणी 

▶️ संदीप मधुकर सोनार (जळगाव)

संपादन सहाय्य

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
5 July 2022 at 05:33 ×

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई मार्फत प्रतीनिधीक काव्यसंग्रह नजराणा काव्यसंग्रह प्रत मिळाली. सदर उपक्रमात सहभागी होता आलं याबद्दल काव्यसंग्रह संपादिका वृशाली खाड्ये मॅडम तसेच सुरज कुदळे सर, दिलीप जाने सर, वर्षा चोपदार मॅडम,संदिप सोनार सर आपण सर्वांनी मला सहभागी करून घेतले त्याबद्दल खुपखुप धन्यवाद. सर्व कवींच्या कविता संग्रह पाहुन अतिशय आनंद झाला. अनंत कल्पनांच्या शब्दांची सुरेख गुंफण असलेला काव्यसंग्रह एक अमूर्त स्वरूपात उपलब्ध झाला.सर्व कवींचे अभिनंदन..

Congrats bro DNYANESHWAR BHIMRAO BHOYAR you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar