सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 290 दि.23/07/2022

                छान छान गोष्टी भाग 290 

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.23/07/2022

निळा राजा

एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते.

             त्या परटाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते.

लांडगा परीटाच्या घरात पोहचला आणि त्याने सरळ खिडकीतून घरात उडी मारली. लांडग्याची उडी नेमकी निळीच्या भांड्यात पडली. लांडगा त्या भांड्यात लपून बसला. पाठलाग करणारी कुत्री घराबाहेर घुटमळली आणि थोड्या वेळाने निघून गेली.

           सकाळ होताच लांडगा घरा बाहेर पडला आणि जंगलात पळून आला. आपला रंग निळा झाला आहे हे त्याला माहितच नव्हते. लांडगा जंगलात पोहताच त्याला बघून अनेक प्राणी पळून गेले. निळ्या रंगाचा प्राणी ते प्रथमच बघत होते. लांडग्याला काहीच समजत नव्हते कि हे सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत ?

           नदीजवळ जाताच लांडग्याने स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघितले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वत:चे निळे प्रतिबिंब बघून त्याला समजले कि जंगलातील प्राणी आपणास का घाबरत आहेत ते..!

      सर्व घाबरलेल्या प्राण्याचा लांडगा राजा झाला आता त्याचे दिवस मजेत चालले होते. एके रात्री जंगलातले काही लांडगे एकत्र आले आणि जोरजोरात आरोळ्या ठोकू लागले. 'निळा लांडगा' स्वत:चे राजेपण विसरून ओरडू लागला. निळ्या लांडग्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना त्यचे खरे रूप कळले. आपण मूर्ख बनलो हे प्राण्यांना कळले सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी त्या लांडग्याला जंगलाबाहेर हुसकून लावले. 

🔺️ चित्ररूप पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »