सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 283 दि.14/07/2022

              छान छान गोष्टी भाग 283

वाचा रे वाचा!






       गुरूवार दि.14/07/2022

देवाचे अस्तित्व सर्वत्र असणे !

देव सर्वत्र आहे, ही अनुभूती घेतलेला शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे

एका महात्म्याचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यूजवळ आला, तेव्हा ‘वारस कोणाला करावे ? कुणाला गादी द्यावी’, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने दोन फळे घेतली. त्या शिष्यांना एक-एक फळ दिले आणि सांगितले, ‘‘ही फळे अशा जागी जाऊन खा की, तिथे तुम्हाला पहाणारा कुणीच नसेल.’’

एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला; पण कुणी नाही, असे स्थानच त्याला सापडले नाही; कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले.

🔺️ चित्ररूप पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »