सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 278दि.29/06/2022

              छान छान गोष्टी भाग 275 

वाचा रे वाचा!






       बुधवार दि.29/06/2022

      अकलेची उणीव

एकदा पशूंच्या मेळाव्यापुढे एका माकडाने चांगला नाच करुन दाखविला. त्यामुळे त्या सर्वांनी त्याला आपला राजा निवडले. पण कोल्ह्याला मात्र हे आवडले नाही. केवळ चांगला नाच केला म्हणून कुणी प्राण्यांचा राजा होऊ शकत नाही, असे त्याला वाटत होते. त्याने सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण कुणी त्याचे ऐकले नाही. मात्र कोल्ह्याने हार मानली नाही. माकडाचा मूर्खपणा उघड करायचाच असे त्याने ठरवले. एका पारध्याने मांडलेले जाळे पाहून कोल्ह्याने त्या माकडाला तिथे नेले आणि तो म्हणाला, ती पहा, तिथं एक मस्त मेजवानी आहे. ती राजेसाहेबांच्याच योग्यतेची असल्यामुळे मी तिला हातही लावला नाही. घ्या आपण ती. माकडही काही विचार न करता पुढे गेले आणि त्या जाळ्यात अडकले. त्याबरोबर त्याने आपल्याला फसविल्याबद्दल त्या कोल्ह्याची निर्भत्सना केली. तेव्हा कोल्हा म्हणाला, पण मित्रा, तुझ्यासारखा मूर्ख पशूंचा राजाही होऊ शकतो.

तात्पर्य : पात्रता नसताना सर्वोच्च पद मिळणे धोकादायकच असते.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट 

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »