छान छान गोष्टी भाग 266
वाचा रे वाचा! |
गुरुचे महत्व
भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला खूप महत्व आहे. कोणताही कलावंत हा परमेश्वरा खालोखाल आपल्या गुरुलाच मानत असतो. गुरु म्हणजे ईश्वर असे मानणारे ही शिष्य आहेत. पण काही उलट स्वभावाचेही असतात. गुरुची आवश्यकताच काय? असे विचारणारेही आहेत. असाच प्रश्न एका शिष्याने रामकृष्ण परमहंसांना विचारला, तो म्हणाला, ठाकूरजी, शिष्याच्या जीवनात गुरुची कार्य, स्थान काय असते? गुरुपासून लाभ कोणता? रामकृष्ण म्हणाले, ती समोर दिसणारी होडी पाहिलीस? आपल्या या आश्रमापासून कलकत्त्यास पोहोचण्यास त्या होडीला कितीसा वेळ लागेल? शिष्य म्हणाला, लागतील चार तास... रामकृष्ण म्हणाले, पण समज, ही आपली होडी एका मोठ्या बोटीला जोडली तर? शिष्य म्हणाला, तसं झालं तर आपण फक्त अर्ध्या तासात कलकत्याला पोहोचू... रामकृष्ण म्हणाले, गुरुची महती अशी आहे बेटा. जी प्रगती करण्यास शिष्याला वर्षानुवर्षे लागतात, ती गुरुच्या प्रसादाने सहज व लवकर होते.
तात्पर्य: यशस्वी जीवनासाठी गुरुचे मार्गदर्शन हवेच.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon