छान छान गोष्टी भाग 262
![]() |
वाचा रे वाचा! |
पक्षी आणि पारधी
एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, 'अरे, हे तू काय करतो आहेस?' यावर पारधी म्हणाला, 'तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.' पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला.
ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, 'यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका.' हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, 'अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !'
तात्पर्य - लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या जवळही उभे रहात नाहीत.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon