📢 'साहित्यविश्व' साहित्यिकांचे विचार
🤔 जग कसं अजब आहे .......
▶️देवावर प्रेम सर्वांनाच आहे. ...पण 'त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही.
▶️आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. ...पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.
▶️देव आपल्या घरी आला म्हणजे, 'सण, उत्सव आणि आनंद.' आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे, 'दुःख, शोक,'
▶️देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा.
▶️देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'. देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'.
▶️दोन्ही अटळ आहे. पण ह्यामधली जी गंमत आहे, त्यालाच 'आयुष्य' म्हणतात.
वपुकाळे
▶️ सरस्वती आणि वीणा
“ मंगेशकर घराणं हा मंगेशाचाच अवतार आहे. तरीही ८८ आशा भोसले हा चमत्कार आहे. तिच्या आवाजात वीज आहे. ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं. वादळ आहे पण ते काहीही उद्ध्वस्त करीत नाही. मादकता तर • विलक्षण आहे पण कामुकता नाही. ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते, यौवनात प्रवेश करू शकते, स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते. लताला सरस्वती माना खुशाल, आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे. वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती ना कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते. सरस्वतीला आपण नमस्कार करतो. आदराने पण लांबून. वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं. लताचा सूर तुम्हाला अज्ञात प्रवासाला घेऊन जातो. आशा आपल्या घरी येऊन गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते."
संदर्भ : सखी
ConversionConversion EmoticonEmoticon