सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 251 दि.28/05/2022

         छान छान गोष्टी भाग 251

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.28/05/2022

मुंगी आणि टोळ 

 एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ रहात होते. टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे. पण मुंगी दिवसभर कष्ट करायची. ती बगीचाच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करून आणायची, तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा, गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा. टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागत असे. लवकरच हिवाळा आला, दिवसरात्र थंडी पडू लागली. थंडीमुळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत. टोळ अन्न शोधात राहिला, आणि पूर्ण वेळ भुकेला राहिला, पण मुंगी कडे मात्र हिवाळा संपेपर्यंत निश्चिन्त पणे पुरेल इतका पुरेसा अन्नसाठा होता. 

तात्पर्य: तारुण्यात कष्ट करा म्हणजे म्हातारपणात पश्चातापाची वेळ येणार नाही.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट 

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »