छान छान गोष्टी भाग 249
![]() |
वाचा रे वाचा! |
दुधाचा पेला
एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले. बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता प्रौढ झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली. जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती "रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातून!"
तात्पर्य: चांगले काम कधीच वाया जात नाही.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon