छान छान गोष्टी भाग 247
![]() |
वाचा रे वाचा! |
स्फटिकाचा चेंडू
नासिरला त्याच्या बागेतल्या वडाच्या झाडामागे एक स्फटिकाचा चेंडू सापडला. जेव्हा झाडाने त्याला सांगितले की हा चेंडू तुझी मनोकामना पूर्ण करेल तेव्हा नासीर ने खूप विचार केला पण त्याला काय मागावं हे सुचलं नाही. त्यामुळे त्याने तो स्फटिकाचा चेंडू पिशवीत ठेवला, आणि मनोकामना सुचण्याची वाट बघण्याचे ठरवले. दिवसामागून दिवस गेले पण त्याने मनातली इच्छा मागितली नाही, पण त्याच्या एका चांगल्या मित्राने नासिरला स्फटिकाच्या चेंडूकडे पाहताना पाहिलं. त्याने तो नासीर कडून चोरला आणि गावातल्या सगळ्यांना दाखवला. त्या सगळ्यांनी सोने आणि राजवाडे मागितले. पण प्रत्येक जण एकच इच्छा मागू शकत होता. आता सगळ्यांकडे फक्त सोने आणि आलिशान राजवाड्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. सगळेजण उदास झाले आणि त्यांनी नासिरकडे मदत मागायचे ठरवले. नासिरने मनोकामना व्यक्त केली की, गावकऱ्यांनी लोभीपणापायी जे गमावलं ते पूर्ववत होऊदे. राजमहाल आणि सोने गायब झाले आणि सगळे गावकरी अधिसारखेच आनंदी आणि समाधानी झाले.
तात्पर्य: पैसे आणि संपत्ती मधून आनंद मिळत नाही.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon