सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 233 दि.07/05/2022

      छान छान गोष्टी भाग 233

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.07/05/2022

मोह

 एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.

भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’

 भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.

झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : गोबीचा कर्कश्श आवाजाचा जानी दोस्त

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »