सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 230 दि.04/05/2022

     छान छान गोष्टी भाग 230

वाचा रे वाचा!






       बुधवार दि.04/05/2022

प्राण्याला सर्वात प्रिय काय ?

एकदा बादशहाने दरबारी मंडळींना प्रश्न केला की, "या जगात प्राणिमात्राला सर्वात अधिक प्रिय काय असेल?" 

या प्रश्नावर बहुतेक सर्वजण म्हणाले, "आपले मूल."परंतु बिरबल म्हणाला, "महाराज, या जगात प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो."

बिरबलाच्या या उत्तराला बादशहाने सिद्ध करून दाखवायला सांगितले. यानंतर बिरबलाने एका रिकाम्या हौदाच्या मध्यावर त्या हौदाच्या एकूण उंचीपेक्षा थोडा कमी उंचीचा खांब रोवला. यानंतर त्या हौदात एका वानरीला तिच्या पिल्लासह सोडण्यात आले. इतके झाल्यावर बादशहा व इतर दरबारी मंडळींना, त्या हौदा जवळ नेऊन बिरबल ने हौदात पाणी सोडणे सुरू केले. 

जसं जसे हौदात पाणी वाढायला लागले तसे ती वानरी आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून खांबावर चढू लागली. खांब शेंड्यापर्यंत बुडताचा आपले पिल्लू डोक्यावर घेऊन ती वानरी खांब्यावर उभी राहिली. परंतु नंतर ते पाणी आणखी वर चढू लागले आणि वानरीच्या गळ्याला लागले. तेव्हा मात्र आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिल्लाला खाब्याच्या शेंड्यावर ठेवून ती त्या पिल्लावर उभी राहिली, व आपले प्राण वाचविण्याचा प्रयत्न करू लागली.

असा प्रकार पाहताच बिरबल बादशहाला म्हणाला, "महाराज, या जगामध्ये प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो, हे माझे म्हणणे आता तरी तुम्हाला पटले ना? आपल्या प्राणांची पर्वा न करता मुलाचे प्राण वाचवणारे आईबाप ही असतात, पण ते अगदी अपवादाने."

बादशहाने बिरबलचे म्हणणे मान्य करताच, बिरबलाच्या हुकुमावरून सेवकाने नाकातोंडात पाणी गेलेल्या वानरी च्या पिल्लाला बाहेर काढले

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : कामसू मुंग्या

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.cm

Previous
Next Post »