सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 226 दि.29/04/2022

        छान छान गोष्टी भाग 226

वाचा रे वाचा!






       शुक्रवार दि.26/04/2022

आळस हा माणसाचा शत्रू 

 एका आश्रमात एक गुरू आणि शिष्य राहत होते. गुरू आपल्या शिष्यावर खुप जास्त प्रेम करत होते. आणि शिष्य सुध्दा आपल्या गुरुंवर तेवढेच प्रेम करायचा पण गुरुजींचा विध्यार्थी हा एक आळशी शिष्य होता. तो कोणत्याही कामाला पुढे ढकलत असे, आश्रमात गुरूंनी सांगितलेल्या अभ्यासाला उशिरा करत असे कधी कधी तर अभ्यास सुध्दा करत नसे. यामुळे त्याच्या गुरुजींना त्याच्या भविष्याची चिंता वाटत असे. आणि गुरुजी नेहमी त्याच्या विषयी चिंतेत राहत असतं. कारण गुरुजींना माहिती होत की आळशी मनुष्याला जीवनात अपयशाचा सामना करावा लागतो.

या गोष्टीचे गुरुजींना चांगल्या प्रकारे ज्ञान होते. म्हणून त्यांनी आपल्या शिष्याच्या भविष्याच्या वाटणाऱ्या चिंतेला सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले. एक दिवस ते गुरुजी आपल्या शिष्याजवळ जातात, आणि त्याला एक चमत्कारी दगड देत सांगतात की, मी दोन दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे, आणि दोन दिवसांनंतर मी परत येणार, आणि त्याच्या हाती एक चमत्कारी दगड देत सांगतात या दगडाला तू कोणत्याही लोखंडाच्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूचे रूपांतर सोन्यात होईल. तुला या वस्तूचा उपयोग करून जीवनात मोठे व्हायचं असल्यास ही तुझ्याजवळ एक चांगली संधी आहे. म्हणून तू दोन दिवसात या वस्तूचा वापर करून घे. आणि त्यानंतर मला परत कर. आणि तेथून निघून गेले.

शिष्य त्या वस्तूला मिळाल्याने खूप आनंदित होतो पण आळशी असल्याने त्याने त्याचा पूर्ण दिवस फक्त हा विचार करण्यात गमावला की त्याच्याजवळ किती सोने येणार आणि तो किती श्रीमंत बनणार. एवढा श्रीमंत बनणार की त्याला पाणी प्यायला सुध्दा एका ठिकाणावरून उठावे सुध्दा लागणार नाही. या गोष्टीचा विचार करत करत पहिला दिवस असाच निघून जातो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उशिरा उठतो आणि विचार करतो की आजचा पूर्ण दिवस माझ्याजवळ आहे. आणि आज मी जेवण केल्यानंतर बाजारात जाऊन बरेचशे सामान विकत घेणार आणि त्याला सोन्यात बदलवणार.असा विचार करत तो आरामात उठून तयारी करतो, आणि पोट भरून जेवण करतो. पोटभर जेवल्या नंतर त्याला झोप येते आणि एवढी गाढ झोप लागते की त्याला सरळ संध्याकाळी जाग येते.

तो उठतो आणि बाजाराकडे धाव घेतो, बाजाराकडे धाव घेता घेता मधातच त्याला बाहेरगावा वरून परत येताना गुरुजी भेटतात, तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात बरं झालं तू इथे भेटला मी तुझ्याकडेच येणार होतो, तुला दिलेला तो चमत्कारी दगड कुठं आहे तो मला परत कर. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणतो गुरुजी फक्त एक दिवस आणखी मला तो चमत्कारी दगड वापरायला द्या.

पण त्यावर गुरुजी आपला नकार देतात आणि त्याच्या हातून तो दगड परत घेतात, आणि त्या शिष्याचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न तेथेच भंग होते. आपल्या आळशीपणावर त्याला पश्चाताप होतो आणि तेव्हा तो ठरवतो की जीवनात कधीही आळशी पणा करणार नाही, कधीही कामचोर पणा करणार नाही. आणि जीवनात एक चांगला व्यक्ती बनण्याचा निर्णय घेतो.

याचप्रकारे जीवन सुध्दा आपल्याला बरेचश्या संध्या देतं पण आपल्याला त्या ओळखता येत नाही, म्हणून जीवनात आळसाला दूर सारून प्रयत्न आणि योग्य दिशेने मेहनत केल्यास आपल्याला यशप्राप्ती होण्याची संधी अधिक प्रमाणात असते.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : मला खूप गोष्टी बनवता येतात

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »