सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 224 दि.27/04/2022

        छान छान गोष्टी भाग 224

वाचा रे वाचा!






       बुधवार दि.27/04/2022

खरा पुत्र

 तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या!

साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे! एवढ्यात तो मुलगा समोरून येतो, मोठमोठ्याने वेदमंत्र अस्खलित संस्कृतात उच्चरत, यांना अभिवादन करून पुढे जातो. त्याची आई म्हणते हाच कि माझा मुलगा!

दुसरी म्हणते, माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही, त्याच्या सुंदर आणि धष्टपुष्ट शरीरावर तरुणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात, तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो, चौघीना प्रणाम करतो, नजर खिळवून बसलेल्या तरुणींकडे बघत मिशिवर पीळ देत मिश्किल हसतो व पुढे जातो,

आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट, इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात, ती म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत, चारचौघांसारखा आहे तो. अरे, हा काय समोरून येतोय. तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो, आईला लाडिक रागावतो की का गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन!

तो मडके घेऊन घरी जातो.

इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते, काय गं, मग आमच्या तिघीपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला, दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तिसरी साहजिक नाराज होती.

ती चौथी स्त्री म्हणाली, "तिघींपैकी? मला तर फक्त एकीचाच 'मुलगा' दिसला, जो आता आईच्या डोक्यावरचे मडके घेऊन गेला"

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : काकूचं बाळ

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »