छान छान गोष्टी भाग 217
![]() |
वाचा रे वाचा! |
हुशार कोल्हा
एक जंगल होते तिथे सर्व प्राणी रहात होते. एके दिवशी जंगलाच्या मद्यभागी कोल्ह्यला एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीच्या जाड कातडे असल्यामुळे तुकडे करून खाऊ शकत नसतो.
थोड्या वेळाने तिथे सिंह येतो. कोल्हा म्हणतो ,महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे. सिंह म्हणतो मी दुसर्यांनी शिकार केलेले प्राणी खात नाही. सिंह निघून जातो. कोल्ह्यला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातडयाचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल.
लवकरच तिथे चित्ता येतो. कोल्हा म्हणतो, सिंहराजाने या हत्ती ला मारलेले आहे. तो त्याच कुटुंब आणण्यासाठी गेला आहे. तो पर्यंत खाऊन घे. 'चित्ता म्हणतो अरे पण ...! सिंह मला मारून टाकिल ना.. तेव्हा कोल्हा म्हणाला तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग.सिंह जवळ येताना दिसला कि मी तुला इशारा करीन.
चिता हतीच्या मांसावर तुटून पडतो. चिता मांस वरील कातडी फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो आणि चित्ता पळून जातो. कोल्हा खाली बसतो आणि जेवणाचा आंनद लुटतो.
तात्पर्य- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : बुली आणि वाघ
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon