छान छान गोष्टी भाग 185
![]() |
वाचा रे वाचा! |
पाण्यात पाहणारे सांबर
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, 'माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती. हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !' असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, 'अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.'
तात्पर्य :आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपले प्राण वाचवू शकतात तर आवडणाऱ्या गोष्टी घातही करू शकतात.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
ConversionConversion EmoticonEmoticon