सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 167 दि.19/02/2022

                  छान छान गोष्टी भाग 167

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.19/02/2022

राजाचा अंत

 एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत!मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे." यमदुताने त्याला म्हटले,"राजन!प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेंव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, " ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिवून अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.

तात्पर्य - लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : मातीचं ढेकूळ आणि पान Clod And Leaf

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »