सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 151 दि.01/02/2022

                छान छान गोष्टी भाग 151

वाचा रे वाचा!






       मंगळवार दि.01/02/2022

खरे ऐश्वर्य

 आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"

तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : नदी River

📢 आजच्या गोष्टीचा खालील Video पहा व लक्षपूर्वक ऐका.

तुमच्या इयत्तेनुसार खाली उपक्रम दिले आहेत ते पूर्ण करून ग्रुपवर पाठवा.

▶️इ.१ली व २री - 

प्रश्न - तुम्हांला माहित असलेले नदीचे गाणे म्हणा व व्हिडीओ करून पाठवा.

▶️इ.३री ते ५वी

प्रश्न - नदी जर तुमच्याशी बोलू लागली तर तुम्ही तिच्याजवळ काय-काय गप्पा माराल? कल्पना करा आणि लिहा.

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »