छान छान गोष्टी भाग 139
वाचा रे वाचा! |
जीवनाचा उपयोग
कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.
तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : अस्वल आणि मासा Bear Goes Fishing
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
📢 तुमच्या इयत्तेनुसार पूरक उपक्रम खाली दिले आहेत ते पूर्ण करून ग्रुपवर पाठवा.
▶️ इ. १ली व २री :
प्रश्न- अस्वलाचे चित्र काढून त्यामध्ये रंग भरा व आपल्या ग्रुपवर पाठवा
▶️ इ. ३री ते ५वी :
प्रश्न- मासे पकडण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? पालकांच्या मदतीने लिहा व पाठवा.
ConversionConversion EmoticonEmoticon