छान छान गोष्टी भाग 136
![]() |
वाचा रे वाचा! |
क्रांतिकारी उधमसिंह
सन १९१९ मध्ये जालियनवाला बागेत एक आमसभा सुरु होती. इंग्रज सरकारचा अधिकारी जनरल डायरने निर्दोष लोकांवर गोळीबार केला. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली, क्रांतिकारकामध्येही या घटनेने वातावरण ढवळून निघाले आणि संतापाचा उद्रेक होण्याची वेळ झाली. उधमसिंह नावाच्या क्रांतीकारकाने जनरल डायरचा बदला घेण्याचा विडा उचलला. उधमसिंहानी दिवस आणि वेळ ठरवून जनरल डायरवर गोळी झाडली. परंतु ते पकडले गेले. त्यांच्यावर खटला भरला गेला. न्यायाधीशांसमोर त्यांना उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गर्दीतून वाट काढत एक इंग्रज तरुणी पुढे आली व तिने न्यायाधीशांकडे उधमसिंह यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी तिला परवानगी दिली. त्या मुलीने उधमसिंह यांना एकच प्रश्न विचारला," तुम्ही ज्यावेळेला गोळ्या झाडल्या त्यावेळी अजूनही तुमच्या पिस्तुलात तीन गोळ्या शिल्लक होत्या. मी पण इंग्रज आहे, मलाही इंग्रज या नात्याने तुम्ही का मारले नाही. तसे करून तुम्ही पळून जावू शकला असता पण तुम्ही गेला नाहीत. असे का केले याचे उत्तर द्या!" उधमसिंह यांनी त्या तरुणीला ओळखले, तिच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले,"भगिनी! आम्ही भारतीय आहोत. महिलेवर हात उचलणे आमच्या संस्कृतीविरुद्ध आहे. त्यामुळे मी आपल्यावर गोळी झाडली नाही. तसे करणे आम्हा भारतीयांना शोभले नसते." हे उधमसिहांचे विचार ऐकून न्यायालय व ती तरुणी चकित झाले.
तात्पर्य-नीतिवान मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही संस्कृतीप्रमाणे आचरण करतो. नैतिकता हि संस्कारातून येते. संस्कारहीन माणसे हीन दर्जाचे वर्तन करतात.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : चाक
📢 आजची गोष्ट ऐकण्यासाठी खालील Video पहा.
ConversionConversion EmoticonEmoticon