छान छान गोष्टी भाग 122
![]() |
वाचा रे वाचा! |
भिक्षु आणि राजा
एक राजा नेहमी उदास राहायचा. लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे. त्याच्या नगरात एक भिक्षु आला भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिक्षूला विचारले." मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांतता मिळत नाही. मी काय करायला हवे?" भिक्षु म्हणाले,"आपण एकांतात बसून चिंतन करा." राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला. तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाई साठी तिकडे आला. राजाशी तो चर्चा करू लागला. कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली. ती ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दु:ख जाणून घेतले. सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजले कि कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत. राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी राजाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षुशी भेट झाली. तेंव्हा भिक्षूने विचारले," राजन! आपल्याला काही शांतता मिळाली का?’’ राजा म्हणाला,’’ मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्हापासून मी मनुष्याच्या दु:खाचे स्वरूप जाणले तेव्हापासून अशांतता थोडी थोडी कमी होत आहे.’’ तेव्हा भिक्षुने समजावले,’’ राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे. बस्स, त्या मार्गाने पुढे जा, एक राजा तेव्हाच प्रसन्न राहू शकतो जेव्हा त्याची प्रजा सुखी असेल.’’
तात्पर्य – दुस-याचे दु:ख समजून घेण्यातच खरी शांतता लाभते. दुस-याच्या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दु:खातही सहभागी व्हावे. त्याचे दु:ख कमी करता आले तर आपल्या मनाला शांतता मिळते. सहकार्य महत्वाचे आहे.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : बुडबुड्यांचे रहस्य The Bubble Mystery
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon