छान छान गोष्टी भाग 105
वाचा रे वाचा! |
सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्याच्यांकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्याात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्याा काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.
निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हांला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्यावची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वारचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही. त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : होळी Holi
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon