सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

महती भारताची ई - काव्यसंग्रह व प्रमाणपत्रे

✍ अक्षरक्रांती प्रकाशित

2987 |ISBN| 2021| P

(Application Reference Number)

📕 महती भारताची ई-काव्यसंग्रह 

🔺️ ISBN NUMBER 

978-81-951768-3-0

🔺️ प्रथम आवृत्ती 15/10/2021

(विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर)

🔺️ प्रसिद्धी

• रत्नागिरी टाईम्स दि.25/10/2021

• संपादक मंडळ 

▶️ वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई)

संपादिका व प्रकाशक 

▶️ सुरज राजेंद्र कुदळे (नाशिक)

मुद्रक व मुखपृष्ठ

▶️ संदीप मधुकर सोनार (जळगाव)

संपादन सहाय्य

▶️ दिलीप यशवंत जाने (जळगाव)

संपादन सहाय्य 

▶️ वर्षा प्रमोद चोपदार (मुंबई)

संपादन सहाय्य 

• प्रस्तावना : संजय गवांदे 

(कवी, लेखक, निवेदक, कथाकथनकार आणि व्याख्याता)

• शुभेच्छा : एकनाथ आव्हाड 

सुप्रसिद्ध बालसाहित्यिक 

📕 आमचे प्रकाशित काव्यसंग्रह वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

• ऋणनिर्देश

'आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्ताने 'महती भारताची' (ISBN 978-81-951768-3-0) हा ई-काव्यसंग्रह आपल्या हाती सोपवताना अत्यानंद होत आहे. 

🇮🇳 महती भारताची ई-काव्यसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

🔺️ सहभाग प्रमाणपत्रे:

  

आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्याची ७५ वे वर्ष साजरे करण्याची संधी मिळणे हे खूपच गौरवशाली व भाग्यशाली आहे. या पर्वामध्ये शाश्वत भारताची परंपरा आहे. स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब आहे. ज्यावेळी आपण स्वाभिमान आणि बलिदान यांची परंपरा आपल्या पुढच्या पिढीला शिकवतो, त्यांना याविषयीचे संस्कार देतो, प्रेरणा देतो तेव्हा राष्ट्राचा गौरव जागृत राहतो. भारताकडे समृद्ध इतिहास, चैतन्यमयी सांस्कृतिक वारसा आहे. त्याचा परिचय करून देण्याचा एक अल्पसा प्रयत्न 'महती भारताची' या  ई- काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केलेला आहे. 

नेहमी लिहणाऱ्या कवी, कवयित्रींसोबतच नुकतेच लिहू लागणाऱ्या नवोदितांच्या काव्यांनी हा अंक सजलेला आहे. विशेष म्हणजे चौथ्या वर्गात शिकणारी संविधा सातव्या वर्गात शिकणारी अनिष्का, प्राप्ती, अल्पिता, अनुश्री या बालकवयित्रींच्या कविताही खरोखरच कौतुकास्पद आहेत. हा अंक वाचत असताना रसिक वाचक म्हणून आपणांस एक आस्वाद मिळणार आहे, अमृतानुभव मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे.

यापूर्वीच्या अंकांप्रमाणेच या अंकाचेही आपण निश्चितच स्वागत कराल ही आमच्या संपादक मंडळाला खात्री आहे. आपणांकडून झालेले स्वागत आम्हां सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायक ठरते. 

या अंकाच्या निर्मितीसाठी दिलीप यशवंत जाने (जळगाव), वर्षा प्रमोद चोपदार (मुंबई), सुरज राजेंद्र कुदळे (नाशिक),संदीप मधुकर सोनार (जळगाव) यांचे अनमोल सहकार्य लाभले. 

🇮🇳 महती भारताची ई-काव्यसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

📕 Flipbook स्वरूपात महती भारताची ई-काव्यसंग्रह वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(बोटाने पुस्तकाची किंवा वहीची पाने उलटवितो तशी Flipbook ची पाने उलटवा व वाचण्याचा आनंद घ्या.)

🇮🇳 Flipbook link Copy करा.

https://online.fliphtml5.com/pcfvp/qfwq/

✍ प्रतिक्रिया वाचा.

● खुप सुंदर काव्यसंग्रह आहे. 

आमच्या सारख्या नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळालं खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा 🙏🙏💐💐

● खूपच सुंदर काव्यसंग्रह व मांडणी, आम्हा नवोदित कवींना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वृषाली खाडये मॅम व टिमचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🌹🌹

● 👌🏻👌🏻👌🏻 खूप छान संग्रह..

● नमस्कार हा काव्यसंग्रह अतिशय छान आहे तो वाचतांना विशेष आनंद होतो भारताची  गौरवशाली महती समजते व जाणवते देखील.

● 🙏🏻अतिशय छान आकर्षक काव्य संग्रह आहे.लेखन करणाऱ्याना एक चांगली संधी या माध्यमातून मिळाली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद🙏🏻

● अतिशय सुरेख आणि खूपच सुंदर काव्यसंग्रह व मांडणी निवेदित कवींना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वृषाली खाड्ये व सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻🙏🏻

● खूप छान वाटले. सर्व कविताही अप्रतिम व binding तर लाजवाब 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

● नमस्कार,देशभक्तीने ओतप्रोत असा हा काव्यसंग्रह,यातील एक एक कविता वाचताना  देशप्रेम  अंतरंगात उतरते,नव आत्मप्रेरणा  जागृत करते,मुळात वृषाली खाडये मँम व टीम यांचं अभिनंदन!🌹🌹 विषय संकल्पना सुरेख👍👍 आमच्यासारख्या नवोदित कवींना  सुवर्णसंधी दिल्याबद्धल खुपखुप आभारी....धन्यवाद!🙏

सय्यद तहेसीन मसुदअली,लातूर.

● अक्षरक्रांती प्रकाशनातर्फे महती भारताची हा ई काव्यसंग्रह प्रकाशित करून कवींना व नवोदीतांना एक यशस्वी  व्यासपीठ मिळवून दिले आहे.  हा कविता संग्रह वाचतांना आपण भारतीय आहोत म्हणून अभिमानाने छाती फुलते. ...शतशः धन्यवाद !

अविनाश कृष्णराव कावळे

● महती भारताची ई काव्यसंग्रह हा व्यासपीठ उपलब्ध करून मला यात आपल्या भारताचे गुणगान गाणारी कविता सादर करता आली,आणि आपल्या मंडळाने मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व समूहाचे मनस्वी आभार मानतो. अशीच वेळोवेळी संधी उपलब्ध करून द्याल,हीच नम्र विनंती.सर्वच रचना अप्रतिम,आणि सुंदर आकर्षक मांडणी केलेली आहे,🏵️आपला सदैव ऋणी🏵️

● खूप छान संग्रह..👌👌

वृषाली मॅम व संपूर्ण टीम खरोखरं खूप छान कार्य आहे. वारंवार संधी उपलब्ध करून नवोदितांना प्रेरणा देण्याचे कार्य आपल्या हातून असेच अविरतपणे होत राहो👏🏻 👌👌

    आपल्यात  देखील एक कवी दडलेला आहे , हे फक्त संधी उपलब्ध झाल्यावर मला कळले. *काव्यांजली ई- काव्यसंग्रहात* पहिली कविता लिहिण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर *स्वलिखित कविता गायन* स्पर्धत द्वितीय क्रमांक आणि इथूनच कविता लेखनास सुरुवात केली. माझा स्वलिखित ४५ गीतांचा *बालउपहार* प्रकाशित झाला. त्यानंतर मार्गदर्शन करणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या व आजपर्यत *४० स्वलिखित कविता* लेखनाचा प्रयत्न केला. *चारोळी डायरीतून अक्षर ओळख* हा सध्या राबवित असलेल्या उपक्रमात असंख्य शब्द चारोळी आहेत. 

      वृषाली मॅम व टिमची आभारी आहे. आपण जे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आपली सदैव ऋणी राहिल.

महती भारताची या सुंदर काव्यसंग्रहात सहभाग घेता आला नाही परंतु *मंथन काव्यसंग्रहात* सहभाग नोंदवता आला, मनस्वी आनंद झाला. 

 राज्यस्तरिय गृपचा

झाला विस्तीर्ण वृक्ष 

राबवूनी विविध उपक्रम

विषयाची निवड असते सखोल लक्ष

           धन्यवाद !!!👏🏻👏🏻

● खुपच छान कविता आहेत...संपादन तर अप्रतिम आहे...सर्व  तंत्रस्नेही टिमचे अभिनंदन  आणि धन्यवाद सुद्धा.....देशभक्तीने काठोकाठ  भरलेल्या कविता आहेत सर्व...🙏🙏🙏💐💐श्री.गजानन मधुकर नानोटे...✍️

● अतिशय सुंदर पद्धतीने कवितांचा संग्रह प्रकाशित केलेला आहे .

सर्व संपादक मंडळास मनापासून हार्दिक शुभेच्छा.अशाच प्रकारे हिंदी भाषे मध्ये सुद्धा कवितेचं किंवा लघुकथांचा संग्रह प्रकाशित होत असेल तर अधिक चांगले होईल.💐

डॉ.राजेश्वर बुंदेले अकोला,महाराष्ट्र

● अक्षरक्रांती प्रकाशन तर्फे महती भारताची हा ई काव्यसंग्रह प्रकाशित झाला.नवोदित कवींना आपल्या कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली.प्रत्येक कविता वेगवेगळ्या भावनेने लिहिल्या आहेत त्यामुळे वाचतांना सुद्धा नाविन्य वाटते.तसेच आद. वृषालीताई खाड्ये मॅम आणि सर्व टीमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏💐💐अशाच प्रकारचे काव्यसंग्रह नियमित काढावेत असे माझे मत व्यक्त करते.

सौ.वनिता महादेव लिचडे जि.भंडारा

● संग्रह अतिशय देखना,सुबक आणि अप्रतिम रचनांनी कसदार,वाचनीय आणिसंग्राह्य झाला आहे ,वृशाली ताई खूप खूप  अभिनंदन आणि शुभेच्छा.

● अप्रतिम! वृषाली ताई उत्कृष्ट नियोजन आमचं लेखन असंच बहरत राहो.

तुषार धांडे नासिक

● वृषाली मॅडम, आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. 

आम्हां शिक्षकांतील सुप्तगुणांना काव्यसंग्रहातून वाव दिल्याबद्दल आपले आभार 🙏🙏

सौ.अंजली सुभाष गोरेगांवकर 

कांदिवली(पूर्व) मुंबई 101

● खूप छान काव्यसंग्रह झाला आहे. कविता पाठवण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद 🙏सौ. दमयंती शशिकांत वाघुले,ठाणे.

● खूप सुंदर,अप्रतिम असा भारताचा गौरवशाली ई काव्यसंग्रह प्रकाशित झाला.भारताच्या अमृतमहोत्सवानिमीत्त नवोदितांना कविता सादर करण्याचे भाग्य लाभले,खूप आनंद वाटला.सर्वच कवितांची रचना अप्रतिमआहे ,त्यातून ओसंडून वाहणारी देशभक्ती प्रत्येक कवितेतून प्रतित होते.एकंदरीत कवितांचे संकलन ते प्रकाशन होईपर्यंत खूप उत्सुकता होती आणि आज उत्तम काव्यसंग्रह पहावयास मिळाला.ग्रुपच्या माध्यमातून लिखाणास उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले. आदरणीय वृषालीताई खाडये व सर्व तंत्रस्नेही टीमचे खूप खूप आभार !! 💐💐🙏🏻🙏🏻

श्रीम. मेहेत्रे जयश्री,ता.जि.बीड

● 👌खूपच छान आहे काव्य संग्रह.

वृषाली ताई व पूर्ण टीमचे छान कार्य,

म्हणून सुरु केले कवींनी लेखन कार्य

असेच लाभो नव कवींना सहकार्य .

श्री. दामोदर चांग्या बेडेकर 

मु.पो.दिघी, ता.श्रीवर्धन- रायगड.

● धन्यवाद मॅडम आपणांस मनापासून धन्यवाद आपण काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे 🙏🙏🙏🙏 डॉ बर्डे नंदलाल भिमराव नेहरू कनिष्ठ कला महाविद्यालय सावखेडा ता गंगापूर जि औरंगाबाद.

● अतिशय सुंदर काव्यसंग्रह आहे 

आपण आम्हा नवोदित कवींना संधी दिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद.. 🙏💐

● 🙏 प्रथमतः नवोदित कवींना प्रेरणात्मक सुवर्णसंधी दिल्याबद्दल आपले वृषालीताई व सहकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🌹🌹अक्षरक्रांती प्रकाशनातर्फे महती भारताची हा ई काव्यसंग्रह प्रकाशित करून आपण नवोदीतांना एक यशस्वी  व्यासपीठ मिळवून दिले आहे. काव्यसंग्रह वाचतांना आपणास सर्वगुणसंपन्न भारताची नव्याने ओळख होते,भारतीयत्त्व जपले पाहिजे.  ही विचारधारा अशीच अखंडित वाहत राहो. हीच मनोकामना🙏☺️ मनःपूर्वक धन्यवाद !

तनुजा रमेश. मुंबई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📢 महती भारताची सहभाग प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे : 

• Certificate download करण्यासाठी blue रंगातील आपल्या नावावर CLICK करा. Certificate drive मधे open होईल. तेथून download करा.

• Sheet मधे नाव पटकन शोधण्यासाठी sheet वर -खाली,उजवीकडे-डावीकडे सरकवा.

🔺️🔺️ Certificates Sheet 🔺️🔺️ 

      THANKS FOR VISIT 

https://www.wetechnosavy.co.in


Previous
Next Post »