📕डाॅ.निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित 'वाचू आनंदे' उपक्रम ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न
🔺️मंगळवार दि.18/01/2022
✴ निमंत्रणपत्रिका
📕 विषय : 'चला वाचूया, या डॉ. विजया वाड पुरस्कृत राज्यस्तरीय उपक्रमात आपला कवी/कवयित्री म्हणून सहभाग नोंदवण्याबाबत.
▶️ अक्षरक्रांती प्रकाशन
नोंदणी क्रमांक :100139642103
ISBN नोंदणी क्रमांक : 2987 |ISBN| 2021| P
▶️ प्रकाशक
वृषाली सुरेश खाड्ये,मुंबई
मो.9967001411
▶️उपक्रम सहाय्य
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
मो.8452920080
2) दिलीप यशवंत जाने,जळगाव
मो.94033 91050
▶️तांत्रिक सहाय्य
1) सुरज राजेंद्र कुदळे,नाशिक
मो.90496 60257
2) संदीप मधुकर सोनार,जळगाव
मो.88065 06804
🔺️उपक्रमाचे नियम :
1) बालकांची आवड लक्षात घेऊन स्वलिखित बालसाहित्याचा स्विकार करावा.
2) इयत्ता 1 ली ते 10 वी विद्यार्थ्यांचा विचार करावा.
3) प्रथम फेरीसाठी एक दर्जेदार,अप्रकाशित कविता या Google form मधे copy paste text करावी.वर शीर्षक व कवितेखाली पूर्ण नाव,पत्ता,मोबाईल नंबर लिहावा.
4) WhatsApp वर पाठवलेली रचना स्विकारली जाणार नाही.
5) प्रथम निवड फेरीसाठी आपली एक काव्यरचना दिनांक 28/11/2021 रात्री 10 पर्यत पाठवावी.
6) प्रथम फेरीत निवड झाल्यावर एका कवीने 16 कवितांची pdf पाठवायची आहे.
7) pdf कशी असावी याची माहिती दिली जाईल.त्यानुसार pdf तयार करावी किंवा तांत्रिक सहाय्य घ्यावे.
8) आपली निवड झाल्यावर आपणांस संपर्क करून पुढील सूचना दिल्या जातील. वारंवार फोन करू नये.
9) खालील संकेतस्थळावरही नावे जाहीर केली जातील.
https://msahitymanch.blogspot.com
📢 आपल्या माहितीसाठी प्रकाशकांना पाठवलेले उपक्रम पत्रक येथे क्लिक करा.
🔺️ उपक्रम पत्रक मजकूर वाचा.👇
प्रति,
सन्माननीय प्रकाशक,
मा. श्रीम. वृषाली सुरेश खाड्ये अक्षरक्रांती प्रकाशन, मुंबई
विषय : 'चला वाचूया, या डॉ. विजया वाड पुरस्कृत राज्यस्तरीय उपक्रमात आपला प्रकाशक म्हणून सहभाग नोंदवण्याबाबत
महोदय, सस्नेह नमस्कार!
'चला वाचूया या उपक्रमांतर्गत डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल अॅड कल्चरल ट्रस्ट आयोजित नव वर्षाचे स्वागत आणि बालसाहित्यिक माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने करावयाच्या उपक्रमात आपला सहभाग अपेक्षित आहे. राज्यस्तरीय १०० कवी, लेखक तसेच ११ प्रकाशकांची फौज घेऊन बालसाहित्याची १६ पानी पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. उपक्रम मार्गदर्शनाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिक कवी, लेखक अरुणजी म्हात्रे सर यांनी सांभाळली आहे. आपणा सर्वांसाठी ही सुखद बाब असून सर्व प्रकाशकानी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी पुढील पानावर पहावे.
उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे :
१) दहा कवी, लेखकांची निवड करून ३० नोव्हेंबपर्यंत नाव नोंदणी करावी.
२) बालकांची आवड लक्षात घेऊन साहित्याचा स्वीकार करावा.
३) ५० पुस्तकांच्या छपाईचा खर्च ट्रस्टमार्फत आपल्याला दिला जाईल.
४) लेखकाला पाच पुस्तके मोफत दिली जातील.
५) अधिक माहितीसाठी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
श्रीम पूनम राणे, समन्वयक आणि श्रीम, मनीषा कदम, समन्वयक 9757438752 7506027287
६) पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ. विजया वाड आणि साहित्यिकाचा फोटो. डॉ. विजया वाड याचा उपक्रमाविषयी हेतू, उद्देश लिहिला जाईल,
(७) मुखपृष्ठाच्या मागील पानावर डॉ. निशिगंधा एज्युकेशन अॅण्ड कल्चरल ट्रस्टचे प्रतीक छापले जाईल.
८) पुस्तकाची किंमत वाजवी म्हणजेच रु. 30/- ठेवावी.
📕 चला वाचूया,या उपक्रमात सहभाग नोंदवायचा असल्यास खालील Google Form भरावा.
अंतिम दिनांक 28/11/2021 रात्री 10 पर्यंत.
ConversionConversion EmoticonEmoticon