छान छान गोष्टी भाग 85
![]() |
वाचा रे वाचा! |
ताकत
सकाळचे दहा वाजले. शाळेची घंटा वाजली. मुले आपआपल्या वर्गात जाऊन बसली. शिक्षक वर्गात आले. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. शिक्षकांनी देखील स्मित हास्य करून विद्यार्थ्यांना बसण्यास सांगितले. वर्ग सुरू झाला. शिक्षक बोलले मुलांनो आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार. मुलांना आनंद झाला.
सरांनी फळ्यावर *ताकत* हा शब्द लिहिला. मुलांना मोठयाने वाचायला सांगितले. मुलांनी देखील एका स्वरात ताकत हा शब्द वाचला.सर पुढे म्हणाले , मुलांनो हा शब्द वहीत लिहा आणि तुम्हाला या शब्दा बद्दल जे सुचेल ते लिहायला सुरुवात करा.
सर्वांनी पट-पट या शब्दांविषयी लिहायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने ताकत म्हणजे काय? ताकतीचा उपयोग? कोणामध्ये ताकद जास्त आहे? ताकत कशी येते ? असे जे मनात येईल ते त्या वही मध्ये लिहून काढले. थोड्यावेळाने सरांनी विचारले "झाले का रे सर्वांचे लिहून " सर्वांचा होकार आला. प्रत्येकाने वहीत काही ना काही लिहिले होते. त्यामुळे सर्वांच्या चेहेरावर आनंद दिसत होता. आता सरांनी एक - एक विद्यार्थ्यांला वाचून दाखविण्यास सांगितले. एक विद्यार्थी उभा राहिला, त्याने वाचण्यास सुरुवात केली,
" सर ताकत म्हणजे बॉडी, आणि ही बॉडी व्यायाम करून बनते".
दुसरा मूलगा उभा राहिला आणि वाचून म्हणाला "सर माझ्यात इतकी ताकत आहे ना की , ही बेंच मी एकटा उचलतो.
तिसरा मुलगा उभा राहिला आणि म्हणू लागला " ताकत म्हणजे शक्ती"
चौथा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला " सर माझ्यात एवढी ताकत आहे ना की मी , तीन मुलांना एकटा जरूर मारू शकतो.
आता मात्र शिक्षक हसू लागले. आणि पुढच्या मुलाला थांबवून बोलू लागले." मुलांनो, ताकत या शब्दाचा अर्थ तुम्ही जरा वेगळाच लावला आहे. हे खरं आहे की ताकत म्हणजे शक्ती, बॉडी. परंतु या ताकतीचा अर्थ दुसरे देखील आहेत. चला तर आपण समजून घेऊया. जस तुम्ही म्हणालात ताकत म्हणजे शक्ती, बळ, जोर, दम हे खरेच आहे. परंतु ताकत या शब्दांचे दुसरे अर्थ म्हणजे " सामर्थ्य ,योग्यता आणि महत्त्वाचे म्हणजे क्षमता ."
हे शब्द ऐकून सर्व मुले एकमेकांचे चेहरे पाहू लागले, हे शब्द अगोदर त्यांच्या कानांवर पडले देखील असतील परंतू यांचा अर्थ ताकत असा असेल , या बाबत ते अनभिज्ञ होते. सरांना त्याची व्याकुळता समजली, आणि ते म्हणाले. अरे बाळांनो, मी तुम्हाला समजून सांगतो.
सामर्थ्य म्हणजे काय ?स्वतःवरील नियंत्रण, तुमचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास. आपण नक्की काय करू शकतो , आपण एखादे ध्येय ठरविले तर मिळविण्यासाठी आपले सामर्थ्य आपल्याला समजायला हवे. त्या ध्येय प्राप्तीसाठी आपली योग्यता आपल्याला समजायला हवी. आणि त्यासाठी आपण किती परिश्रम घेऊ शकतो यासाठी आपली क्षमता देखील आपणास ठाऊक हवी. उदा. आपल्या वर्गातील काही विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शालेय स्पर्धा मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम आले. त्यांनी त्यांचे सामर्थ्य , त्यांची क्षमता ही ओळखलीच होती की, आणि म्हणूनच त्यांनी कठोर परीक्षम घेऊन त्यांची योग्यता त्या ठिकाणी सिद्ध केली. ताकत ही फक्त शारीरिक नसते , ती बौद्धीक देखील असते. बुद्धिबळात शारीरिक शारीरिक ताकती पेक्षा बौद्धीक ताकतीला महत्व असते. त्यामुळे आपण आपली आंतरिक सामर्थ्य ,योग्यता आणि महत्त्वाचे म्हणजे क्षमता हे लवकरच ओळखले पाहिजे. तरच आपला आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. म्हणून आजपासून आपण शारीरिक ताकदी बरोबर आंतरिक ताकत देखील वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर समजले ताकत म्हणजे काय? सर्व विद्यार्थी एका स्वरात आनंदाने 'हो' म्हणाले. त्यांच्या त्या होकारात आता आत्मविश्वासाची ताकत होती.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद
📕 आजच्या गोष्टीचे नाव : खीर Rice Pudding
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon