छान छान गोष्टी भाग 78
वाचा रे वाचा! |
सत्संगाचा महिमा
एकदा राहूगण राजा पालखीत बसून कपील मुनींच्या आश्रमात जात होता. पालखीचा एक सेवक आजारी पडला. त्यामुळे राजाने सांगितले, ‘‘जो कोणी दिसेल त्याला पालखी उचलण्यासाठी घेऊन या.’’ सेवकांनी भरताला पाहिले. ‘हा चांगला तगडा जवान आहे’, असे वाटून त्यांनी त्यालाच पकडून आणले. पालखी घेऊन जात असतांना राजाने भरताचा अपमान केला. तो म्हणाला, ‘‘तू नीट चालत नाहीस. वाकडा-तिकडा चालतोस, त्यामुळे मला पालखीत पुष्कळ त्रास होतो.’’ एकदा राजाचे डोके पालखीच्या लाकडावर आपटले. त्या वेळी राजाने भरताला सांगितले, ‘‘तुला मी दंड करीन.’’
वास्तविक राजाकडून भरताने एक दमडीसुद्धा घेतली नव्हती किंवा अन्नसुद्धा सेवन केले नव्हते, तरीपण राजाच्या अहंकारी वृत्तीने भरताला मारायला राजा प्रवृत्त झाला. भरताने विचार केला की, राजा आपल्या शरिराला मारतो, आत्म्याला काहीच होत नाही; म्हणून मी मौनच धरीन.भरताने विचार केला,
राहूगण राजाला मी उचलले आहे. जर राजाचा अहंकार नष्ट न झाल्यामुळे तो नरकवासी झाला, तर सत्संगाचा महिमा नष्ट होऊन जाईल.’ लोक म्हणतील, ‘‘जडभरताच्या संगतीत राहूनसुद्धा राजाला नरकवास घडला.’’ सत्संगाचा महिमा कायम राखण्यासाठी भरताने मौन सोडले आणि राजाशी बोलायला प्रारंभ केला. भरताने राजाला उपदेश केला, ‘‘राजा कल्याण होवो. तू कपील मुनींच्या आश्रमात उपदेश घेण्यासाठी जात आहेस; पण तुझा अहंभाव सोडून जा.’’ त्या वेळी राहूगण राजाने भरताची क्षमा मागितली; म्हणून भरताने राजाला आत्मज्ञानाची अनुभूती दिली.’
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : बोळक्यांचा तबला
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon