छान छान गोष्टी भाग 75
![]() |
वाचा रे वाचा! |
राजा आणि पुजारी
गावात एक राजा राहत होता. तो देवभक्त होता. त्या गावात एक शंकराची पिंडी होती. त्याचा एक पुजारी होता. तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. त्याला अधून मधून देवदर्शन होत असे. राजा रोज देवळात जायचा. देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा. देवासाठी दानधर्म करायचा.
राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही ? पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो ? एके दिवशी राजा देवळात गेला असताना पुजारी पूजा करत होता. तेवढ्यात थोडा भूकंप झाला. देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. राजा लगेच पळून गेला. त्या वेळी पुजार्याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Now You Are Gone आता तू संपलास
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon