सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 73दि.19/10/2021

     छान छान गोष्टी भाग 73

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       मंगळवार दि.19/10/2021

बाबांचा चमत्कार

 साईबाबा शिर्डीत होते तेव्हा ते दररोज नित्य नियमाने व्दारकामाईत पणत्या लावत असे. ते शिर्डीत इतर जी काही देवळे होती, त्या देवळांमध्येही ते पणत्या लावत असे. या पणत्या लावण्यासाठी त्यांना जे तेल लागत असे, ते गावातील वाण्याकडून व तेल्याकडून घेत असत. पणत्यांचे तेल आणण्यासाठी त्यांनी एक पत्र्याचा डबा तयार केला होता. रोज जाऊन तेल जमा करणे व देवळात येऊन दिवा लावणे हा त्यांचा दैनंदिनीचा भाग होता. त्यांची पणत्या लावण्याची वेळ ठरलेली होती.

एक दिवस शिर्डीमधील वाण्यांनी व तेल्यांनी म्हणजेच सर्व दुकानदारांनी ठरविले की, या फकीराला इथून पुढे तेल दयायचेच नाही. किती दिवस आपण याला तेल दयायचे? हे एक दिवस बंद करायला हवे.

बाबांच्या नियमाप्रमाणे ते डबा घेऊन तेल मागण्यास गेले तेव्हा एका दुकानदाराने त्यांना तेल देण्यास नकार दिला. बाबांना वाटले की, त्याची काही तरी अडचण असेल. ते दुसऱ्या दुकानावर गेले. तेथेही तोच अनुभव आला. त्यांना वाटले की, ते दोघेही कंटाळले असतील. मग तिसऱ्या दुकानावरही तोच अनुभव आला, मग बाबांच्या लक्षात आले. तरीपण बाबांनी तेल मागण्यासाठी सर्व दुकानावर हजेरी लावली आणि ते व्दारकामाईत आले. ते कोणालाही काही बोलले नाही. त्यांना कोणाचा राग आला नाही.

गावातील काही लोक आता बाबांच्या लीलेकडे पहात होती की, बाबा आता पणत्या कशा पेटवणार? 

त्यांच्याकडे तर तेल नाही! बाबा कोणाशी बोलत नव्हते व कोणाकडे पहातही नव्हते. बाबांनी एक डबा भरून पाणी आणले. प्रत्येक पणतीत त्यांनी तेलासारखे थोडे-थोडे पाणी ओतले. एक एक पणती पेटवून बाबा व्दारकामाईकडे पहात उभे राहिले.

जेव्हा पणत्यातील पाण्याने पेट घेतला तेव्हा तेथे उभे असलेले लोक आश्चर्यचकित झाले. ही बातमी वाणी व तेली यांच्यापर्यंत पोहोचली. गावातील सर्व लोकांना ती कळाली. सर्व लोक पाण्याने पेटलेल्या पणत्यांचा चमत्कार पहाण्यासाठी तेथे गोळा झाली. वाणी व तेली यांचा गर्व नष्ट झाला होता. ते बाबांना शरण आले. 

यावरून आपणा सर्वांच्या लक्षात आले असेल की, एखाद्या संताला किंवा फकिराला दिलेल्या दानाचे मोजमाप करायचे नसते. त्यांना जे दयायचे आहे ते देत रहावे.

‘जो संतांना दान देतो, त्याला सन्मान मिळतो.

संत व फकिर घरी येताच तुम्ही त्यांना दान करा,

परमेश्वराचे रूप घेऊन कोणीही येईल, त्याला नाही म्हणू नका.

संत जेव्हा घरात येतील, तेव्हा त्यांचे चरण स्पर्श करा.’

यातून आपल्याला असा बोध होतो की, कोणीही कोणाची परीक्षा घेऊ नये, कारण जो तो आपल्या जागी ज्ञानी असतो.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : चालणारा डोंगर

🔺️ आजच्या गोष्टीचा Video पहा व खालील उपक्रम करा.

तुमच्या इयत्तेनुसार पूरक उपक्रम आधारित प्रश्न पुढीलप्रमाणे दिले आहेत ते पूर्ण करून ग्रुपवर पाठवा .

इ. १ली व २री - उंटाप्रमाणे अजून कोणकोणत्या प्राण्यांना वाशिंडे असतात? पालकांच्या मदतीने त्या प्राण्यांची नावे लिहा.

इ. ३री ते ५वी - तुम्ही कधी कोणत्या प्राण्यावर बसून सैर केली असेलच? तुमच्या शब्दात अनुभव लिहा.

      THANKS FOR VISIT 

Previous
Next Post »