छान छान गोष्टी भाग 68
![]() |
वाचा रे वाचा! |
मोठे स्वप्न
एका गावात गीताबाई नावाची बाई रहात होती. तिला एक मुलगा होता. तो मुलगा रात्री झोपेत दचकून उठायचा, रडायचा आणि वेडयासारखा हसायचा. कधी कधी तर तो झोपेतून उठून बाहेर चालायचा.
गीताबाईने त्याला तिला माहित असलेल्या जाणत्याला दाखविले, गंडा दोरा घातला. भुतबाधा असेल तर वैद्याला दाखविले. परंतु काहीच फरक पडत नव्हता. तो मुलगा दिवसभर खूप चांगला असायचा, पण रात्री मात्र तो बैचेन व्हायचा. गीताबाई रात्रभर जागी रहायची. कारण तिला भीती वाटत असे की, जर तो उठून वाटेवर गेला तर, एखाद्या विहिरीत वगैरे पडला तर! विशेष म्हणजे त्यांच्या वाडयाच्या अंगणात आड होता. म्हणून गीताबाईला रात्री अजिबात झोप येत नसे. ती प्रत्येकाला मुलाबद्दल सांगायची. तिला वाटत असे की, आपल्या मनातील दुःख जर आपण सांगितले तर त्यावर कोणीतरी तिला काही इलाज सांगेल.
तिने एक दिवस ही गोष्ट तिच्या शेजारच्या बाईला सांगितली. तेव्हा सईबाई तिला म्हणाली, “गीता, तुझ्या मुलाला शिर्डीला घेऊन जा. तिथे एक बाबा आहेत, त्यांना साईबाबा असे म्हणतात. त्यांचा खूप गुण येतो. आपल्या शेजारच्या दोन बायकांना त्यांचा गुण चांगला आला आहे. तू उदया तेथे जा कारण उदया गुरूवार आहे. बरेच लोक गुरूवारी येतात.”
तेव्हा गीताबाई म्हणाली, “होय, मी उदयाच मुलाला बरोबर घेऊन जाते.”
गीताबाई दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या बरोबर शिदोरी घेऊन शिर्डीला निघाली. भर दुपारी गीताबाई, तिचा नवरा व मुलगा यांना घेऊन तिथे पोहोचली. तेव्हा बाबा झाडाखाली बसले होते. तिला पाहून बाबांनी विचारले, “बोल माय, कस येण केल? कोणत्या गावातून आलात? बसा, पाणी प्या, भर उन्हातच आला आहात.”
बाबांनी त्यांना ग्लास भरून पाणी दिले. तेव्हा गीता त्यांना म्हणाली, “तुम्ही बसा बाबा, आम्ही आमच्या हाताने पाणी घेतो.”
त्यावर बाबा तिला म्हणाले, “ते माझे कामच आहे. माझ्या झोपडीत तुम्ही आलात. तर मला तुमची सेवा ही करायलाच पाहिजे.”
सर्वांनी पाणी पिल्यावर बाबांनी त्यांना विचारले, “काय झाले आता सांगा!” गीताने बाबांना सांगितले की, “आमचा मुलगा हा अर्जुन, दिवसभर चांगला असतो. पण रात्री त्याला झोपच नसते. त्याला कसले कसले स्वप्न पडतात. गावातील सगळया वैद्याला दाखविले परंतु काहीच गुण आला नाही.”
मग बाबांनी त्या मुलाला विचारले, “काय रे बाळा, तू शाळेला जातो का? शेती काम करतो का?” अर्जुन त्यांना म्हणाला, “मी शाळेत जातो बाबा.” बाबा म्हणाले, खर तर शाळेतल्या मुलांना स्वप्न कसे पडतात?” बाबांनी त्याला उदी लावली व डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवला व मंत्र म्हटले. बाबा त्याला म्हणाले, “जा बाळा आता, तुला स्वप्न पडणार नाहीत. पण लक्षात ठेव, मुलांनी स्वप्न पाहिले पाहिजे, आणि ती स्वप्न मोठी असली पाहिजे.”
बाबांनी अर्जुनला केलेला हा संदेश अतिशय महत्वाचा आहे. तो प्रत्येक घरात जाणे आवश्यक आहे.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Baadh बाढ
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
तुमच्या इयत्तेनुसार वाचन उपक्रम आधारित प्रश्न पुढीलप्रमाणे दिले आहेत ते पूर्ण करून ग्रुपवर पाठवा.
इ. १ली व २री - या गोष्टीतील चिमणीच्या पिलांचे पालकांच्या मदतीने चित्र काढून रंग द्या.
इ. ३री ते ५वी - तुम्ही पाहिलेल्या पुरस्थितीचे पालकांच्या मदतीने तुमच्या शब्दात वर्णन करा.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon