वाचा रे वाचा! |
चांगल्या गोष्टी
एके दिवशी अचानक बादशहाने दरबाऱ्यांना तीन प्रश्न विचारले - ‘कोणाचा मुलगा सर्वोत्तम आहे? कोणाचे दात सर्वोत्तम आहे? कोणाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे’?
सर्व दरबारी आपापसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा करायला लागले. त्यांच्यातील एक मोठा दरबारी बोलला ‘महाराज! राजाचा मुलगा सर्वोत्तम आहे. हत्तीचे दात सर्वोत्तम आहे. व ज्ञान ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे.’
अकबरने सर्व उत्तरे ऐकली व विचार करू लागला, जर बिरबल येथे उपस्थित असता तर त्याने मला अधिक योग्य उत्तरे दिली असती.
त्याने तात्काळ बिरबलला बोलविणे पाठविले. बिरबल जेव्हा दरबारात आला तेव्हा अकबरने त्याला त्या तीन प्रश्नांची उत्तरे विचारली.
बिरबल उत्तरला, ‘महाराज गाईचा मुलगा हा सर्वोत्तम आहे. कारण तो आहे की जो जमीन नांगरतो. अगदी त्याचे शेण सुध्दा खत म्हणून उपयोगी पडते. पीक त्याच्यामुळेच उगवते आणि सर्वांसाठी अन्न तयार होते.’
'दुसरे उत्तर आहे की नांगराचे दात हे सर्वोत्तम आहे. तो जमीन नांगरतो व सुपीक बनवतो. तो आपल्याला पीक वाढविण्यासाठी सक्षम करतो.’
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बिरबल बोलला ‘महाराज मी सांगू इच्छीतो की धैर्य सर्वोत्तम गुणवत्ता आहे. बुध्दिमान व्यक्ती पण धैर्याशिवाय काही करू शकत नाही. जरी ज्ञान ही उत्तम संपत्ती आहे , तरी धैर्य हे महत्वाचे आहे.’
अकबर व सर्व दरबारी बिरबने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकून खूप आनंदी झाले.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Frog's Bite Idea
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
पाण्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची पालकांच्या मदतीने चित्रे काढा व नावे द्या.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
बेडकाची चिलट खाण्याची रोजची दिनचर्या झाली होती यावर चिलटांनी स्वतः ला वाचविण्यासाठी काय करू शकले असते असे तुम्हांला वाटते हे पालकांच्या मदतीने लिहा.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon