वाचा रे वाचा! |
झाड आणि कुर्हाडीचा दांडा
एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या.
तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, 'काय ही माझी स्थिती! हा माणूस किंवा ही कुर्हाड करते आहे ते काही चूक नाही.
पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुर्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचं फार वाईट वाटतं.'
तात्पर्य - आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.
_______________________________
सौजन्य ROOM TO READ
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
मुलांनो,आज तुम्हांला छान गोष्ट पाठवली आहे ती ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. गोष्टीच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर लिहून या ग्रुपमध्ये पाठवा. तसेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना भावंडांना व मित्र-मैत्रिणींना देखील गोष्ट ऐकवा...
Shoes And Socks 👈 ही गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
_______________________________
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon