![]() |
वाचा रे वाचा! |
गाढव आणि निर्दय मालक
एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे.
असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता.
त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला.
तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं.
तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.'
तात्पर्य - काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत.
_____________________________
सौजन्य ROOM TO READ
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
मुलांनो,आज तुम्हांला छान गोष्ट पाठवली आहे ती ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. गोष्टीच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर लिहून या ग्रुपमध्ये पाठवा. तसेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना भावंडांना व मित्र-मैत्रिणींना देखील गोष्ट ऐकवा...
खालील गोष्टीचे Flipbook वाचा.
बोटाने वहीचे पान जसे उलटतो तसे Flipbook चे पान उलटवा व समजपूर्वक पुन्हा पुन्हा वाचन करा.
Haathi Ki Peeth वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ConversionConversion EmoticonEmoticon