सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 35दि.04/09/2021


वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       शनिवार दि.04/09/2021

थोडक्यात उत्तर

 एक दिवस, बिरबल बागेत फिरत असताना सकाळच्या ताज्या हवेचा आनंद घेत होता की अचानक एक माणूस त्याच्या जवळ येऊन बोलला ‘तुम्ही मला सांगू शकता की बिरबल कुठे मिळेल?’ 

‘बागेत.’ बिरबल बोलला. 

तो माणूस काहीवेळ थांबला आणि बिरबलला बोलला ‘तो कुठे राहतो?’ 

‘त्याच्या घरात.’ बिरबलने जोरात उत्तर दिले.

तो माणूस अजून काही वेळ थांबला. थोडा वैतागून त्याने पुन्हा विचारले ‘तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता का देत नाही?’

‘कारण तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता विचारलाच नाही?’ बिरबलने आणखी जोरात उत्तर दिले.

‘तुम्हाला लक्षात येत नाही का, मी काय विचारू इच्छित आहे ते?’ त्या माणसाने पुन्हा प्रश्न केला. 

‘नाही.’ बिरबलने उत्तर दिले. 

तो माणूस काही वेळ शांत राहिला, बिरबलचे फिरणे चालूच होते. त्या माणसाने विचार केला की, मी असे विचारले पाहिजे की तू बिरबलला ओळखतो का? तो माणूस पुन्हा बिरबलच्या जवळ गेला आणि बोलला ‘बस, मला तू फक्त इतके सांग की तू बिरबलला ओळखतो का?’ 

'हो, मी ओळखतो.’ बिरबल उत्तरला. 

'तुझे नाव काय आहे?’ त्या माणसाने विचारले.

'बिरबल.’ बिरबलने उत्तर दिले. 

तो माणूस चकित झाला. तो बिरबललाच इतक्या वेळापासून बिरबलचा पत्ता विचारत होता आणि बिरबल होता की जो स्वतःहून स्वतःबद्दल सांगत नव्हता की तो बिरबल आहे. त्याच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती.

'तू किती मजेदार माणूस आहेस!’ असे बोलत तो माणूस काहीसा त्रासदायक दिसत होता, ‘मी तुला तुझ्याबद्दलच विचारत होतो, आणि तू काहीतरी वेगळेच सांगत होतास’ सांग, तू असे का बरे केले? 

‘मी फक्त तू विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली.’ बिरबल बोलला.

बिरबलची हुशारी आणि चातुर्य बघून त्या माणसाला हसू आले. तो माणूस म्हणाला ‘त्याला त्याच्या काही घरगुती समस्या सोडविण्यासाठी बिरबलची मदत घ्यायची होती’ त्यावर बिरबलने मदतीसाठी होकार दिला.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या  कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : Billi Ki Kheer

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)

📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.

🔺️ इयत्ता १ली व २री 

दूध पिणाऱ्या मनीचे पालकांच्या मदतीने चित्र काढून रंग द्या तसेच मांजरीची थोडक्यात माहिती लिहा.

🔺️ इयत्ता ३री ते ५वी 

तुम्ही मनीच्या जागी असता तर लाकडे पेटविण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले असते हे पालकांच्या मदतीने लिहा व चित्र काढा.

      THANKS FOR VISIT 

Previous
Next Post »